शेतकरी विरोधी कायदे रद्द करा ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2021 04:08 AM2021-01-03T04:08:59+5:302021-01-03T04:08:59+5:30
नागपूर : केंद्र शासन शेतकरी विरोधी कायदे करीत असल्यामुळे देशभरातील शेतकऱ्यांनी दिल्लीत केंद्र शासनाच्या कायद्याविरुद्ध आंदोलन सुरु केले आहे. ...
नागपूर : केंद्र शासन शेतकरी विरोधी कायदे करीत असल्यामुळे देशभरातील शेतकऱ्यांनी दिल्लीत केंद्र शासनाच्या कायद्याविरुद्ध आंदोलन सुरु केले आहे. त्यामुळे दिल्लीतील आंदोलन करीत असलेल्या शेतकऱ्यांना पाठिंबा देण्याचा संकल्प अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीच्या वतीने संविधान चौकात करण्यात आला. सोबतच भीमा कोरेगाव येथील दलित बहुजनांच्या विजयाचा शौर्य दिन साजरा करण्यात आला.
दिल्लीत सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी अखिल भारतीय किसान सभा, महाराष्ट्र राज्य किसान सभा, जय जवान जय किसान संघटनेच्या अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीचे पदाधिकारी संविधान चौकात एकत्र आले. केंद्र शासन संविधान डावलून कायदे करीत असल्यामुळे देशाला वाचविण्याची गरज असल्याचे मत अरुण लाटकर यांनी व्यक्त केले. दिल्लीत सुरू असलेला शेतकऱ्यांचा लढा लोकशाहीला वाचविण्यासाठी सुरू असून देशातील नागरिकांनी शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहणे आवश्यक असल्याचे डॉ. युगलू रायलू यांनी सांगितले. दिल्लीतील शेतकऱ्यांच्या आंदोलनात सहभागी होण्यासाठी संघटनेचे कार्यकर्ते ३ जानेवारीला दिल्लीला जाणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. यावेळी घटनेच्या उद्देशपत्रिकेनुसार भारताला घडविण्याचा संकल्प करण्यात आला. अरुण वनकर यांनी संविधानाच्या उद्देशपत्रिकेचे वाचन केले. आभार नासीर खान यांनी मानले. यावेळी संजय राऊत, सुमरन मेश्राम, ज्ञानुदास गजभिये, कल्याण नंदागवळी, दिलीप तायडे, रवी टेंभुर्णे, विलास सूर्यवंशी, जयश्री चहांदे, ज्योती अंडरसहारे, प्रकाश डोंगरे, अभिनव फटींग आदी उपस्थित होते.
............