हज यात्रेवरील जीएसटी रद्द करा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2018 05:40 AM2018-07-11T05:40:00+5:302018-07-11T05:40:17+5:30
हज यात्रेकरूंच्या प्रवास व त्यातील सुविधांवर लावण्यात आलेल्या जीएसटीचा मुद्दा विधानसभेत चर्चेत आला. आमदार आसिफ शेख व आमदार अबू आझमी यांनी हज यात्रेवरील जीएसटी रद्द करण्याची मागणी केली आहे.
नागपूर : हज यात्रेकरूंच्या प्रवास व त्यातील सुविधांवर लावण्यात आलेल्या जीएसटीचा मुद्दा विधानसभेत चर्चेत आला. आमदार आसिफ शेख व आमदार अबू आझमी यांनी हज यात्रेवरील जीएसटी रद्द करण्याची मागणी केली आहे.
राज्यातील अनेक भागांतून मुस्लीम भाविक सौदी अरेबियातील हज यात्रेसाठी दरवर्षी जातात. विधानसभेत महिती देताना शेख यांनी सांगितले, की येत्या २० जुलैला देशातून हजारोच्या संख्येने मुस्लीम समुदायातील भाविक हज यात्रेसाठी मक्का याठिकाणी जाणार आहेत. मात्र केंद्रीय हज कमिटीच्या माध्यमातून जाणाऱ्या हज यात्रेवर १८ टक्के जीएसटी कर लावण्यात आला आहे. स्वतंत्रपणे जाणाºया हज यात्रेकरूंच्या प्रवासासह देणाºया सुविधांवर ५ टक्के जीएसटी लावण्यात आला आहे. हज कमिटीच्या माध्यमातून यात्रेसाठी जाणारे अल्पसंख्यक हे आर्थिकदृष्ट्या सक्षम नसतात. त्यामुळे ते सरकारने दिलेल्या सवलतीत हजची यात्रा करतात. पण सरकारने त्यांनाच जीएसटीचा भुर्दंड लावल्याची खंत शेख यांनी व्यक्त केली.
राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार केंद्रीय जीएसटी कौन्सिलचे सभासद आहेत. मुनगंटीवार यांनी केंद्रीय समितीत हज यात्रेकरूंची बाजू मांडावी, असेही ते म्हणाले.