कर्करोग अंत नाही, इच्छाशक्तीने करा मात

By admin | Published: April 27, 2017 01:54 AM2017-04-27T01:54:20+5:302017-04-27T01:54:20+5:30

एरवी चित्रपट कलाकार इमरान हाश्मी याचे नाव घेतले की डोळ्यासमोर येते ती बिनधास्त, बोल्ड आणि पडद्यावरील

Cancer is not the end, the will to overcome | कर्करोग अंत नाही, इच्छाशक्तीने करा मात

कर्करोग अंत नाही, इच्छाशक्तीने करा मात

Next

इमरान हाश्मी : मुलाच्या लढ्याने दिली नवी दिशा
नागपूर : एरवी चित्रपट कलाकार इमरान हाश्मी याचे नाव घेतले की डोळ्यासमोर येते ती बिनधास्त, बोल्ड आणि पडद्यावरील ‘किसिंग किंग’ची प्रतिमा. मात्र या बेधडक कलाकारामागे एक हळवा, अभ्यासू, सामाजिक जाणीव असलेला व कर्करोगासारख्या रोगावर मात करणारा लढवय्या मुलाचा कणखर बाप लपला आहे, याची बहुतांश लोकांना जाणीवदेखील नाही. ‘लोकमत’ व ‘कोकिलाबेन धीरुभाई अंबानी हॉस्पिटल’च्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘एक जीवन, स्वस्थ जीवन’ या उपक्रमांतर्गत आयोजित परिसंवादादरम्यान इमरानच्या व्यक्तिमत्त्वातील विविध पैलू समोर आले.

इमरान हाश्मीचा मुलगा अयान याला वयाच्या चौथ्या वर्षी कर्करोग झाला होता. इतक्या लहान वयात पोटच्या मुलाला झालेला हा आजार पाहून हाश्मी दाम्पत्य हादरून गेले होते.
मात्र त्यांनी स्वत:ला सावरले व मुलाला या जीवघेण्या आजाराच्या जबड्यातून बाहेर काढले. या प्रवासातून एक गोष्ट निश्चित कळली. कर्करोग हा अंत नाही तर इच्छाशक्तीने त्यावर मात करता येऊ शकते, अशा भावना यावेळी झालेल्या मुलाखतीत इमरानने व्यक्त केल्या. श्वेता शेलगावकर यांनी त्याची मुलाखत घेतली.

समुपदेशन अत्यावश्यक
अयानला कर्करोग झाल्याचे जगाला का सांगतो, असे माझ्या कुटुंबीयांनी सांगितले होते. मात्र जागृती निर्माण करणे माझे कर्तव्य आहे, असे मला वाटले. रुग्णांवर वैद्यकीय उपचार जितके आवश्यक आहे, तितकेच किंवा त्याहून जास्त समुपदेशन अत्यावश्यक आहे. कुटुंबीयांनी दिलेला आधारदेखील महत्त्वपूर्ण ठरतो. अयानवर उपचार करण्याच्या वेळी कधी ‘आयर्न मॅन’ बनवत असल्याचे सांगितले तर कधी शरीरातील राक्षस बाहेर काढत असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांनी सांगितले होते. रुग्णांशी संवाद साधणे गरजेचे असते. कर्करोगाबाबत अनेक जण बाहेर वाच्यता करण्याचे टाळतात. ही मानसिकता बदलल्या गेली पाहिजे, असे आग्रही प्रतिपादन इमरान हाश्मीने केले.

‘लोकमत’च्या पुढाकाराचे कौतुक
कर्करोगासंदर्भातील जनजागृतीसंदर्भात ‘लोकमत’ने आगळ्यावेगळ्या उपक्रमाचे आयोजन केले आहे. कर्करोगाबाबतची माहिती, कारणे, उपचार यांची माहिती जनतेपर्यंत गेले पाहिजे. अशाप्रकारच्या उपक्रमांची समाजाला आवश्यकता आहे, असे कौतुकोद्गार यावेळी इमरानने काढले.
 

Web Title: Cancer is not the end, the will to overcome

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.