उपराजधानीतील खासगी हॉस्पिटलमधील कर्करोगाचा रुग्ण निघाला पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2020 10:23 PM2020-04-27T22:23:29+5:302020-04-27T22:25:05+5:30
ऑटोमोटिव्ह चौकातील एका खासगी हॉस्पिटलमध्ये कर्करोगाच्या रुग्णावर शस्त्रक्रिया झालेल्या रुग्णाचे नमुने रविवारी रात्री पॉझिटिव्ह आल्याने खळबळ उडाली. रुग्णाला तातडीने मेयोमध्ये दाखल करण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ऑटोमोटिव्ह चौकातील एका खासगी हॉस्पिटलमध्ये कर्करोगाच्या रुग्णावर शस्त्रक्रिया झालेल्या रुग्णाचे नमुने रविवारी रात्री पॉझिटिव्ह आल्याने खळबळ उडाली. रुग्णाला तातडीने मेयोमध्ये दाखल करण्यात आले. खबरदारी म्हणून संबंधित खासगी हॉस्पिटल सील केले असून, येथील डॉक्टरांसह सुमारे ५० वर आरोग्य सेवकांना हॉस्पिटलमध्येच क्वारंटाईन करण्यात आले. या रुग्णासह नागपुरात रुग्णांची संख्या १२८ झाली आहे.
उप्पलवाडी येथील रहिवासी असलेला ४४ वर्षीय पुरुष रुग्णाच्या कर्करोगावर १३ एप्रिल रोजी आॅटोमोटिव्ह चौकातील एका खासगी हॉस्पिटलमध्ये शस्त्रक्रिया झाली. त्यानंतर हा रुग्ण घरी गेला. २४ एप्रिल रोजी हा रुग्ण नियमित तपासणीसाठी हॉस्पिटलमध्ये आला. त्याची लक्षणे पाहता डॉक्टरांनी ‘कोविड-१९’ तपासणीचा सल्ला दिला. त्यांच्याकडून होकार मिळताच, मान्यताप्राप्त एका खासगी लॅबला याची माहिती दिली. लॅबच्या तज्ज्ञाचे त्यांचे नमुने घेऊन तपासणीसाठी पाठविले. रविवारी रात्री पॉझिटिव्ह अहवाल प्राप्त झाला. याची माहिती महानगरपालिकेच्या आरोग्य वि•ाागाला देण्यात आली. त्यांनी पहाटे कर्करोग रुग्णाला मेयोमध्ये दाखल केले. खासगी हॉस्पिटलमध्ये या रुग्णावर उपचार झाल्याने मनपाने मंगळवारी हे हॉस्पिटल सील केले. सोबतच रुग्णसेवेत असलेले डॉक्टर, परिचारिका व कर्मचाऱ्यांना पुढील १४ दिवसांसाठी हॉस्पिटलमध्येच क्वारंटाईन केले. यांचे आज तातडीने नमुनेही घेण्यात आल्याची माहिती आहे.
रुग्णाचे पुन्हा तपासणार नमुने
या कर्करोग रुग्णाचा नमुना खासगी लॅबने तपासल्याने हा रुग्ण पॉझिटिव्ह समाजावा किंवा नाही, यावरून आज गोंधळ उडाला. यामुळे आता मेयोच्या प्रयोगशाळेमधून पुन्हा नमुने तपासले जाणार आहे. याला मेयोचे अधिष्ठाता डॉ. अजय केवलिया यांनी दुजोरा दिला आहे. उद्या मंगळवारी नमुन्याचा अहवाल प्राप्त होणार आहे.
वनामतीमध्ये होता तीन दिवस पॉझिटिव्ह रुग्ण
शुक्रवार २४ एप्रिल रोजी ‘एम्स’च्या प्रयोगशाळेत मोमीनपुरा येथील ४४ वर्षीय पुरुषाचे नमुने पॉझिटिव्ह आले. हा रुग्ण वनामतीमध्ये क्वारंटाईन होता. परंतु मनपाच्या पथकाला आज याची माहिती मिळाली. यामुळे रुग्णाला तातडीने मेडिकलमध्ये दाखल केले. सलग तीन दिवस वनामतीमध्ये पॉझिटिव्ह रुग्ण असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
कोरोनाची आजची स्थिती
दैनिक संशयित १५९
दैनिक तपासणी नमुने ३१२
दैनिक निगेटिव्ह नमुने ३०३
नागपुरातील पॉझिटिव्ह नमुने १२८
नागपुरातील मृत्यू १
डिस्चार्ज केलेले पॉझिटिव्ह रुग्ण ३१
डिस्चार्ज केलेले संशयित रुग्ण १३१९
क्वॉरंटाईन कक्षात एकूण संशयित ७५६
- पीडित - १२८ - दुरुस्त - ३१_ - मृत्यू - १
उत्तराखंडमध्ये अडकलाय नागपूरचा मेकअपमॅन! ()
- नागपूरमध्ये परतण्यासाठी होतेय अडचण
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोना विषाणूच्या प्रादु•ाार्वामुळे सारे जग जागच्या जागी थांबले आहे. कल्पनाविश्वात रममाण करून साऱ्यांना खिळवून ठेवणारे चित्रपट उद्योग क्षेत्रही लॉक झाले आहे. लॉकडाऊनपूर्वी अनेक चित्रपटांचे चित्रीकरण सुरू होते. तेही रखडले आहे आणि चित्रिकरणात व्यस्त असलेली मंडळीही तिथेच अडकली आहे. अशाच चित्रीकरणाच्या स्पॉटवर नागपूरचा रंग•ाूषाकार (मेकअपमॅन) अडकला आहे.
रामजी व नकुल श्रीवास बंधू हे नागपुरातील प्रख्यात मेकअप आर्टिस्ट आहेत. नागपूरसह मुंबई व दक्षिण चित्रपट क्षेत्रातून त्यांची मागणी असते. शिवाय, मॉडेलिंगमध्येही मेकअपमॅन म्हणून त्यांना आवर्जुन बोलावले जात असते. या बंधंूपैकी लहान असलेले नकुल हे उत्तराखंड येथील बेरीनाग येथे अडकले आहेत. त्यांच्यासोबत चित्रपटातील तांत्रिक बाजू सां•ााळणारे कलावंतही तेथेच आहेत. असे आठ-दहा जण बेरीनाग येथील एका लॉजवर एकाच रूममध्ये आहेत. विशेष म्हणजे निमार्ताही तेथेच असून, त्याच्याकडून कोणतीही मदत मिळत नसल्याचे ही संपूर्ण मंडळी सांगत आहे. त्यामुळे, या कलावंतांवर उपासमारीचे संकट ओढवण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ही मंडळी आपापल्या •ाागातील सहकारी कलावंतांकडून मदत मागून येणारा दिवस काढत आहेत. नकुल यांच्यासह मुंबईची असलेले हे सारे कलावंत लवकरात लवकर आपल्या गृहनगरात परतण्यासाठी धडपडत आहेत. मात्र, कुठूनही त्यांना मदत मिळत नसल्याचे दिसून येत आहे.
-----------
बॉक्स...
७ मार्चपासून अडकलोय - नकूल श्रीवास
: ७ मार्चपासून तमिळ चित्रपटाच्या चित्रिकरणासाठी मेकअपमॅन म्हणून बेरीनाग येथे संपूण क्रुसोबत आलो. काही दिवस चित्रिकरण सुरू असतानाच २२ मार्चपासून संपूर्ण देशात लॉकडाऊन झाले. तेव्हापासून चित्रपटाचे दिग्दर्शक निशाद •ाारद्वाज व इतर कु्र मेंबर्ससोबत लॉजमध्ये अडकून पडलो आहोत. निमार्ते सिद्धू पुजारी हे सुद्धा येथेच एका हॉटेलमध्ये आहेत. मात्र, ते कोणतही मदत करित नसल्याचे नकुल श्रीवास यांनी सांगितले. अ.•ाा. मराठी चित्रपट महामंडळाकडूनही कुठलेही सहकार्य झाले नाही. चित्रपट मराठी नसल्याने आम्ही काहीच करू शकत नाही, असे त्यांचे म्हणने आहे. जवळचा पैसा संपला आहे. सगळेच क्रु मेंबर्स एकमेकांच्या आधाराने जगत आहेत. नागपुरातून संजय •ााकरे, आसिफ बक्षी, दीपाली घोंगे, आसावरी रामेकर या सहकारी कलावंतांनी केलेल्या मदतीमुळे थोडा आधार प्राप्त झाल्याचे त्यांनी सांगितले.