एलजीबीटी समुदायाची ‘एचसीजी’मध्ये कॅन्सर तपासणी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2022 07:21 PM2022-11-17T19:21:24+5:302022-11-17T19:21:54+5:30

Nagpur News जागतिक स्तराच्या कॅन्सर देखभाल सेवेसाठी नामांकित एचसीजी एनसीएचआरआय कॅन्सर केंद्र नागपूरने १७ नोव्हेंबरला रुग्णालयाच्या परिसरात एलजीबीटी समूहासाठी एकदिवसीय नि:शुल्क तपासणी शिबिराचे आयोजन केले.

Cancer Screening for LGBT Community in 'HCG' | एलजीबीटी समुदायाची ‘एचसीजी’मध्ये कॅन्सर तपासणी 

एलजीबीटी समुदायाची ‘एचसीजी’मध्ये कॅन्सर तपासणी 

googlenewsNext

 

नागपूर : जागतिक स्तराच्या कॅन्सर देखभाल सेवेसाठी नामांकित एचसीजी एनसीएचआरआय कॅन्सर केंद्र नागपूरने १७ नोव्हेंबरला रुग्णालयाच्या परिसरात समाजात सर्वाधिक उपेक्षित तृतीयपंथी आणि एलजीबीटी समूहासाठी एकदिवसीय नि:शुल्क तपासणी शिबिराचे आयोजन केले. ७५ पेक्षा जास्त तृतीयपंथींनी नि:शुल्क कॅन्सर तपासणी करून शिबिराचा लाभ घेतला.

कॅन्सर स्क्रीनिंग पॅकेजमध्ये मॅमोग्राफी, यूएसजी, पॅप स्मियर, नियमित रक्ततपासणी एचसीजीची विशेष चमू कॅन्सरतज्ज्ञ, फिजिओथेरपिस्ट, योगचिकित्सक आणि सायको-ऑन्कोलॉजिस्ट यांच्याद्वारे करण्यात आली. सारथी ट्रस्टच्या सहकार्याने आयोजन करण्यात आले. सारथी ट्रस्ट ही विदर्भातील पहिली समूह आधारित संघटना आहे. ती गेल्या १८ वर्षांपासून एलजीबीटी समूहाच्या आरोग्य, मानवाधिकार आणि कायदेशीर अधिकारासाठी कार्यरत आहे.

रुग्णालयाचे सीओओ वेंकटेश्वरलू मरापका म्हणाले, हे एक दिवसाचे शिबिर नसून आमचे मिशन आहे. कार्यक्रम भविष्यातही सुरू राहील. मेडिकल ऑन्कोलॉजी सल्लागार डॉ. सुशांत इखर म्हणाले, अमेरिकेत विशेषतज्ज्ञांनी केलेल्या दोन वेगवेगळ्या अभ्यासांत भारत आणि थायलँडमध्ये ट्रान्सवुमेनमध्ये क्रमश: ५६ टक्के आणि ४२ टक्के कॅन्सर असल्याची पुष्टी झाली आहे. कार्यक्रमात सारथी ट्रस्टचे निकुंज जोशी, एचसीजीचे डॉ. कमलजित कौर आणि एचसीजी कॅन्सर सेंटरच्या कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. 

Web Title: Cancer Screening for LGBT Community in 'HCG'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.