उपराजधानीत चार मिनिटाचा उशीर परीक्षार्थ्याला भोवला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 3, 2020 10:43 AM2020-03-03T10:43:34+5:302020-03-03T10:45:24+5:30

‘सीबीएसई’तर्फे घेण्यात येणाऱ्या बारावीच्या परीक्षेत नियमांचे पालन न करता परीक्षा केंद्रावर उशिरा येणाऱ्या विद्यार्थ्याला फटका बसला आहे.

¯Candidate with four minutes delay restrict from exam in Nagpur | उपराजधानीत चार मिनिटाचा उशीर परीक्षार्थ्याला भोवला

उपराजधानीत चार मिनिटाचा उशीर परीक्षार्थ्याला भोवला

Next
ठळक मुद्देकेंद्रावर परीक्षा देण्यास मनाई ‘सीबीएसई’च्या नियमांचे पालन केले नाही

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ‘सीबीएसई’तर्फे घेण्यात येणाऱ्या बारावीच्या परीक्षेत नियमांचे पालन न करता परीक्षा केंद्रावर उशिरा येणाऱ्या विद्यार्थ्याला फटका बसला आहे. परीक्षा केंद्रावर चार मिनिटांनी उशिरा पोहोचल्याने विद्यार्थ्याला पेपर देण्यासाठी आत सोडण्यात आले नाही. नियमांचे पालन करणे अनिवार्य असल्याने परीक्षा केंद्र अधिकाऱ्यांकडून त्याला दिलासा देण्यात आला नाही व नाईलाजाने त्याला पेपर न देताच वापस जावे लागले.
परीक्षा केंद्रावर कुठल्याही स्थितीत विद्यार्थ्यांनी दहा किंवा त्या अगोदर पोहोचावे असे निर्देश ‘सीबीएसई’ने अगोदरच दिले आहेत. सोमवारी भौतिकशास्त्राचा पेपर होता. शहरातील एका परीक्षा केंद्रावर सकाळी १० वाजून ४ मिनिटांनी विद्यार्थी पोहोचला. उशिरा आल्याचे कारण देत त्याला पेपरला बसू देण्यात आले नाही. त्याच्या पालकांनी केंद्र चालकांना विनंती केली. परंतु त्यांनी नियमांचा हवाला दिला. यासंबंधात ‘लोकमत’ने ‘सीबीएसई’चे परीक्षा नियंत्रक सौरभ भारद्वाज यांच्याशी संपर्क केला. निर्धारित वेळेपेक्षा उशिराने आल्यास परीक्षा केंद्रावर प्रवेश देण्यात येणार नाही, हे ‘सीबीएसई’ने परीक्षा प्रवेशपत्रांवर स्पष्ट केले आहे. संंबंधित विद्यार्थी पेपर सुरू झाल्यानंतर आला. त्यामुळे त्याला परीक्षा देता येणार नाही. जर त्याला परीक्षेला बसू दिले तर तो नियमांचा भंग ठरेल, असे सौरभ भारद्वाज यांनी स्पष्ट केले. संबंधित विद्यार्थ्याचे भविष्य खराब होऊ देणार नाही व त्याला ‘कम्पार्टमेन्ट’ परीक्षा देण्याची संधी देण्यात येईल, असेदेखील त्यांनी सांगितले.

Web Title: ¯Candidate with four minutes delay restrict from exam in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :examपरीक्षा