अनामत रकमेसाठी उमेदवारांच्या चकरा

By admin | Published: May 7, 2014 02:24 AM2014-05-07T02:24:58+5:302014-05-07T02:24:58+5:30

जिल्ह्यात ग्रामपंचायतीच्या निवडणुका झाल्या. यात अनेकांनी नामांकन अर्ज सादर केले होते. नामांकन अर्ज सादर करताना उमेदवाराने भरलेली अनामत रक्कम परत करण्याचा

Candidates Chakra for Deposit | अनामत रकमेसाठी उमेदवारांच्या चकरा

अनामत रकमेसाठी उमेदवारांच्या चकरा

Next

 रकमेची माहिती नाही : ग्रा. पं. निवडणूक संपली

कारंजा (घाडगे): जिल्ह्यात ग्रामपंचायतीच्या निवडणुका झाल्या. यात अनेकांनी नामांकन अर्ज सादर केले होते. नामांकन अर्ज सादर करताना उमेदवाराने भरलेली अनामत रक्कम परत करण्याचा नियम आहे; मात्र कारंजा तालुक्यात ही रक्कम परत मिळावी, याकरिता संबंधितांना तहसील कार्यालयाच्या चकरा माराव्या लागत असल्याचा प्रकार समोर आला आहे. कारंजा तालुक्यात मे महिन्यात १६ तारखेला विद्यमान सदस्यांचा कार्यकाळ संपणार आहे.

नव्याने तालुक्यातील ३५ ग्रामपंचायतीचा निवडणूक कार्यक्रम घोषीत होवून ३५ २३ मार्च २०१४ रोजी मतदान झाले. निवडणूक २७७ जागांकरिता असली तरी ७८३ उमेदवार रिंगणात होते. यात २६६ उमेदवार निवडून आले. यातही काही ठिकाणी आलेल्या अडचणीमुळे तालुक्यात १७ पदे रिक्त आहेत. निवडणुका मार्च महिन्यात आटोपल्या. विविध प्रवर्गातून नामनिर्देशन पत्रांच्या प्रत्येकी २० प्रमाणे ११०० अर्जांची विक्री झाली. याची रक्कम २२ हजारांच्या घरात आहे. निवडणूक रिंगणात असलेल्या तत्कालिन ७८३ उमेदवारांनी नामनिर्देशन पत्राची अनामत रक्कम संबंधित आरओकडे जमा केली. आरओने ती रक्कम निवडणूक अधिकारी नायब तहसीलदार यांंच्याकडे जमा केली. सदर रक्कम तीन लाखांच्या घरात असल्याचे तहसील कार्यालयातून सांगण्यात आले. निवडणूक संपल्यामुळे ते उमेदवार तहसील कार्यालयात अनामत रक्कम परत मिळावी, याकरिता चकरा मारत आहे. नायब तहसीलदार निवडणूक हे गत दीड महिन्यापासून रजेवर आहेत. त्यांचा भ्रमनध्वनीसुध्दा प्रतिसाद देत नाही. ही रक्कम नेमकी कुठे आहे, याचा पत्ता खुद्द तहसीलदार बालपांडे यांनासुध्दा नाही. त्यामुळे संबंधित उमेदवारांत संभ्रम निर्माण झाला आहे. संबंधित उमेदवार अनामत रकमेकरिता चकरा मारुन थकले आहेत.

कार्यालयातर्फेसुद्धा त्यांना थकवल्या जात असल्याचे दिसून येते. संबंधितांना तहसील कार्यालयातून त्या रकमा परत करण्यास उशिर का होतोय, यामागील कारणही न समजणारे आहे. याबाबत संबंधितांनी तत्काळ लक्ष देत या रकमेची रितसर चौकशी करुन ती त्या उमेदवारांना द्यावी, अशी मागणी जोर धरत आहे. या प्रकरणी तहसीलदार काय कारवाई करतात, याकडे तालुक्यात निवडणुकीत उभ्या असलेल्या त्या उमेदवारांचे लक्ष आहे.(शहर प्रतिनिधी)

नियम म्हणतात...

नामनिर्देशन पत्राची अनामत रक्कम ही तहसील कार्यालयाच्या नाझरकडे जमा असावी व ती रक्कम रितसर कोषागारात सुरक्षीत ठेवावी किंवा पोलीस निगराणीत असावी, असा नियम आहे.

या रकमेबाबत तहसील कार्यालयात विचारणा केली असता कुणालाही माहिती नसल्याचे समोर आले आहे. मग ही रक्कम कुठेच नाही, तर ती रक्कम नायब तहसीलदार निवडणूक यांनी नेमकी कुठे ठेवली, असा नवा प्रश्न उपस्थित झाला आहे. याबद्दल मला काहीच माहिती नाही. मी वर्धेला जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकीत आहे. माहिती घेवून काय ते सांगतो. - जे. आर. बालपांडे तहसीलदार, कारंजा (घा.)

Web Title: Candidates Chakra for Deposit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.