कामठीत गांजा विक्रेता अटकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2021 04:12 AM2021-09-10T04:12:27+5:302021-09-10T04:12:27+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क कामठी : कामठी (नवीन) पाेलीस पथकाने बसस्थानकानजीकच्या झाेपडपट्टी परिसरात कारवाई करीत गांजा विक्री करणाऱ्या आराेपीला रंगेहात ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
कामठी : कामठी (नवीन) पाेलीस पथकाने बसस्थानकानजीकच्या झाेपडपट्टी परिसरात कारवाई करीत गांजा विक्री करणाऱ्या आराेपीला रंगेहात अटक केली. त्याच्याकडून दाेन किलाे ४८४ ग्रॅम गांजा किंमत ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई मंगळवारी (दि.७) सायंकाळी ५.३० वाजेच्या सुमारास करण्यात आली.
जब्बार खान ऊर्फ डुनड्या रहीम खान (३८, रा. बसस्टॅण्डसमाेरील झाेपडपट्टी, कामठी) असे अटकेतील आराेपीचे नाव आहे. आराेपी हा आपल्या राहत्या घरी गांजाची विक्री करीत असल्याची गुप्त माहिती पाेलिसांना मिळाली. त्याआधारे त्यांनी आराेपीच्या घराची झडती घेतली असता, आराेपीच्या घरात दाेन किलाे ४८४ ग्रॅम गांजा आढळला. ३० हजार रुपयांचा गांजा जप्त करून पाेलिसांनी आराेपीला ताब्यात घेत अटक केली. आराेपी अट्टल गुन्हेगार असून, त्याच्या विरुद्ध कामठी पाेलीस ठाण्यात जबरी चाेरी, जिवे मारण्याची धमकी देणे, गंभीर दुखापत करणे तसेच २०१८ मध्ये खुनाचा गुन्हा दाखल आहे. त्याची परिसरात दहशत असून, आराेपीवर कडक कारवाई केली जाणार असल्याचे ठाणेदार विजय मालचे यांनी सांगितले.
याप्रकरणी कामठी (नवीन) पाेलिसांनी कलम २० एनडीपीएस अन्वये गुन्हा नाेंदविला असून, आराेपीला अटक केली आहे. ही कारवाई पाेलीस उपायुक्त नीलाेत्पल, सहायक पाेलीस उपायुक्त राेशन पंडित, ठाणेदार विजय मालचे यांच्या मार्गदर्शनात दुय्यम पोलीस निरीक्षक मंगेश काळे, सहायक पोलीस निरीक्षक सुरेश कन्नाके, पोलीस उपनिरीक्षक श्याम वारंगे, हेडकॉन्स्टेबल पप्पू यादव, मंगेश लांजेवार, राजेंद्र टाकळीकर, प्रमोद वाघ, अनिल बाळराजे, मनोहर राऊत, सुधीर कनोजिया, उपेंद्र यादव, नीलेश यादव, संदीप गुप्ता, ललित शेंडे, दीप्ती मोटघरे यांच्या पथकाने केली.