विशाखापट्टणम-नवी दिल्ली एक्स्प्रेसमधून गांजा तस्करास अटक 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 6, 2021 09:38 PM2021-01-06T21:38:03+5:302021-01-06T21:39:33+5:30

Cannabis smuggler arrested , crime news रेल्वे सुरक्षा दलाने विशाखापट्टणम-नवी दिल्ली विशेष रेल्वेगाडीतून गांजाची तस्करी करणाऱ्या आरोपीला अटक करून त्याच्याकडून २८,७६० रुपये किमतीचा २.८७६ किलो गांजा जप्त केला आहे.

Cannabis smuggler arrested on Visakhapatnam-New Delhi Express | विशाखापट्टणम-नवी दिल्ली एक्स्प्रेसमधून गांजा तस्करास अटक 

विशाखापट्टणम-नवी दिल्ली एक्स्प्रेसमधून गांजा तस्करास अटक 

Next
ठळक मुद्देआरपीएफची कारवाई : २८,७६० रुपयाचा गांजा जप्त

लोकमत  न्यूज  नेटवर्क

नागपूर : रेल्वे सुरक्षा दलाने विशाखापट्टणम-नवी दिल्ली विशेष रेल्वेगाडीतून गांजाची तस्करी करणाऱ्या आरोपीला अटक करून त्याच्याकडून २८,७६० रुपये किमतीचा २.८७६ किलो गांजा जप्त केला आहे.

रेल्वेगाडी क्रमांक ०२८०५ विशाखापट्टणम-नवी दिल्ली एक्स्प्रेसमध्ये आरपीएफचा जवान प्रवीण कुमार गुर्जर, कृष्ण कुमार मीना हे चंद्रपूर ते नागपूरपर्यंत गस्त घालत होते. त्यांना एस ३ कोचमध्ये प्रवास करीत असलेल्या एका व्यक्तीवर संशय आला. त्याच्या खांद्यावर असलेल्या बॅगमधून गांजासारखा वास येत होता. तपासणी केल्यानंतर त्याने एस ३ कोचमध्ये बर्थ क्रमांक ६८ च्या खाली आणखी एक बॅग असल्याची माहिती दिली. त्याने आपले नाव वेगीराजू मुरली क्रिशनम राजू सत्यनारायण राजू (२१) रा. वीरबद्रपुरम, मांडापेटा, आंध्र प्रदेश सांगितले. दोन्ही बॅगबाबत विचारणा केली असता त्यात गांजा असल्याचे त्याने सांगितले. त्यानंतर उपनिरीक्षक दिलीप सिंह यांनी आरपीएफ जवानांसह ही गाडी अटेंड केली. गांजाची तस्करी करणाऱ्या आरोपीला आणि दोन्ही बॅग नागपूर रेल्वेस्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक १ वर मुंबई एण्डकडील भागात उतरविण्यात आल्या. वरिष्ठ अधिकाऱ्यांना सूचना देऊन पंच आणि तहसीलदार चंद्रशेखर लक्ष्मण क्षेत्रपाल यांच्यासमक्ष बॅगची तपासणी करण्यात आली. बॅगमध्ये २८,७६० रुपये किमतीचा २.८७६ किलो गांजा आढळला. त्यानंतर पकडलेला गांजा लोहमार्ग पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आला.

Web Title: Cannabis smuggler arrested on Visakhapatnam-New Delhi Express

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.