नागपुरातील निवारा केंद्र करताहेत बेघरांना सक्षम 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2020 12:37 AM2020-04-16T00:37:18+5:302020-04-16T00:38:58+5:30

बेघरांच्या सुरक्षेच्यादृष्टीने मनपातर्फे सुरू करण्यात आलेले निवारा केंद्र आता बेघरांना सक्षम करण्याचे केंद्र ठरत आहे. आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या संकल्पनेतून या निवारा केंद्रांमध्ये स्वच्छतेसह बेघरांच्या आत्मनिर्भरतेसाठी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे.

Capable of the homeless in Nagpur Shelter Center | नागपुरातील निवारा केंद्र करताहेत बेघरांना सक्षम 

नागपुरातील निवारा केंद्र करताहेत बेघरांना सक्षम 

googlenewsNext
ठळक मुद्देआयुक्त तुकाराम मुंढे यांची संकल्पना : आत्मनिर्भरतेसाठी अनेक उपक्रमांचे आयोजन

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : बेघरांच्या सुरक्षेच्यादृष्टीने मनपातर्फे सुरू करण्यात आलेले निवारा केंद्र आता बेघरांना सक्षम करण्याचे केंद्र ठरत आहे. आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या संकल्पनेतून या निवारा केंद्रांमध्ये स्वच्छतेसह बेघरांच्या आत्मनिर्भरतेसाठी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. शहरातील रस्ते, फूटपाथवर राहणाऱ्या या बेघरांना सक्षम बनवून त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी मनपाने लॉकडाऊ नमध्ये अभिनव उपक्रम हाती घेतला आहे. लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर मनपाच्या समाज कल्याण विभागातर्फे दीनदयाल अंत्योदय योजना-राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानाच्या माध्यमातून आयुक्तांच्या पुढाकाराने नियमित निवाऱ्यासोबतच तात्पुरत्या शहरी बेघर निवाऱ्याची व्यवस्था करण्यात आली आहे. सध्या शहरातील विविध भागातील एकूण २० बेघर निवाऱ्यात १२५२ जणांनी आसरा घेतला आहे. आश्रितांना चहा, नाश्ता व दोन वेळच्या संपूर्ण भोजनाचीही मोफत सोय तेथे केली आहे. तसेच त्यांची काळजी घेतली जात आहे. केंद्रामध्ये आलेल्या बेघरांची अवस्था केस वाढलेले, मळकट कपडे, मळलेले शरीर अशी होती. निवारा केंद्रामध्ये आणल्यानंतर त्यांचे केस कापण्यात आले, रोज अंघोळ करून स्वच्छ नवीन कपडे वापरायला दिले जात आहेत. अनेक स्वयंसेवी संस्थांकडून या बेघरांसाठी नवीन कपडे देण्यात आले आहेत. एकूणच आयुक्तांची संकल्पना आणि स्वयंसेवी संस्थांच्या पुढाकारातून या बेघरांचे पूर्णत: ‘मेकओव्हर’ झाला आहे. बेघरांना आत्मनिर्भर करून लॉकडाऊन नंतर त्यांना सक्षमतेने जीवन व्यतीत करता यावे यासाठी त्यांच्यातील कौशल्य विकसित केले जात आहे. या बेघरांना वेगवेगळ्या कौशल्यांचे प्रशिक्षण देण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून काही दिवसापूर्वी सुतार कामाचे प्रशिक्षण देण्यात आले. त्याचे फलित म्हणजे सर्व प्रशिक्षणार्थ्यांकडून सुंदर स्वरूपाचे पक्ष्यांचे घरटे तयार झाले. याशिवाय पाककलेच्या प्रशिक्षणात सर्वांनी जिलबी सुद्धा बनविली. विशेष म्हणजे या निवारा केंद्रांकरिता व तिथे राहणाºया बेघरांच्या सुविधा आणि प्रशिक्षणाकरिता अनेक स्वयंसेवी संस्थांनी पुढाकार घेतला आहे. या स्वयंसेवी संस्थांच्या पुढाकारातूनच हे सर्व कार्य सुरू आहे.
बेघरांचे सन्मानाने जगणे मान्य व्हावे
या उपक्रमाबाबत तुकाराम मुंढे म्हणाले, लॉकडाऊनमध्ये रस्त्यावर, फूटपाथवर राहणाºया बेघरांची दुरवस्था होउ नये याकरिता मनपाने त्यांची व्यवस्था निवारा केंद्रात केली. मात्र लॉकडाऊन नंतरही या बेघरांनी रस्त्यावरच जीवन व्यतीत करू नये. ते या समाजाचा एक भाग आहेत आणि त्यांनी आपले सामाजिक जीवन स्वीकारावे व समाजानेही त्यांचे सन्मानाने जगणे मान्य करावे यासाठी मनपाने त्यांच्या कौशल्य विकासाचा उपक्रम हाती घेतला आहे. त्यादृष्टीने या निवारा केंद्रातील नागरिकांमधील कौशल्य शोधून त्यांना त्याचे प्रशिक्षण दिले जात आहे. सुतारकाम, बुट बनविणे, स्वयंपाक काम यासारख्या विविध कामांमध्ये रुची असणाऱ्यांना त्यांच्या आवडीनुसार प्रशिक्षण देण्यात येते. मनपाव्दारे २० निवारा केंद्र सुरू करण्यात आले आहेत.

Web Title: Capable of the homeless in Nagpur Shelter Center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.