आमदार आशिष जयस्वाल यांच्या गाडीचा भीषण अपघात, दोन जणांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2024 07:25 PM2024-04-10T19:25:37+5:302024-04-10T19:35:06+5:30
या अपघातात दोन जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.
शिवसेना शिंदे गटाचे आमदार आशिष जयस्वाल यांच्या गाडीचा अपघात झाल्याची बातमी समोर आली आहे. आज दुपारी या गाडीचा अपघात नागपूर येथील केरडी-कन्हान जवळ अपघात झाला. या अपघातात दोन जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.
राज ठाकरेंकडून भाजपला बिनशर्त पाठिंबा; राजू पाटलांची भूमिका काय? सविस्तर सांगितलं!
MLA Ashish Jaiswal's convoy meets with an accident near Kanhan (Nagpur). Two person have been injured. Ashish Jaiswal unhurt and safe. #Nagpur#BJP#LokSabhaElections2024#LoksabhaElection#LokmatTimespic.twitter.com/iMfTY3crWO
— Lokmat Times Nagpur (@LokmatTimes_ngp) April 10, 2024
नाना पटोलेंच्या कारला भीषण अपघात
लोकसभा निवडणुकीसाठीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानासाठी प्रचाराची रणधुमाळी सुरू असताना विदर्भामध्ये एक मोठी दुर्घटना घडली आहे. विदर्भातील भंडारा जिल्ह्यात प्रचार दौऱ्यावर असताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंच्या ताफ्यामधील एका वाहनाला ट्रकने धडक दिली. सुदैवाने या कारमध्ये नाना पटोले नसल्याने ते बचावले.
नाना पटोलेंच्या ताफ्यातील कारला झालेल्या अपघातानंतर काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी विरोधी पक्षाच्या नेत्यांना संपवून भाजपाला निवडणूक जिंकायची आहे का? असा सवाल विचारला आहे. याबाबत केलेल्या ट्विटमध्ये अतुल लोंढे म्हणाले की, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले भंडारा जिल्ह्याच्या प्रचार दौऱ्यावर असताना मंगळवारी रात्री कारदा गावाजवळ त्यांच्या कारला धडक देऊन चिरडण्याचा प्रयत्न एका ट्रकने केला आहे. ही अत्यंत गंभीर घटना असून त्यांचा घातपात करण्याचा डाव होता का? अशी शंका आहे, असा आरोप लोंढे यांनी केला.