नागपुरातील हसनबागमध्ये उभ्या असलेल्या कारला आग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2019 12:12 AM2019-04-27T00:12:30+5:302019-04-27T00:13:17+5:30
हसनबाग परिसरातील डीव्ही पब्लिक स्कूल नंदनवन ले-आऊट मधील जवाहर विद्यार्थी गृहाजवळ उभ्या असलेल्या एका कारला शुक्रवारी रात्री ११ च्या सुमारास आग लागली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : हसनबाग परिसरातील डीव्ही पब्लिक स्कूल नंदनवन ले-आऊट मधील जवाहर विद्यार्थी गृहाजवळ उभ्या असलेल्या एका कारला शुक्रवारी रात्री ११ च्या सुमारास आग लागली. कारमध्ये डिझेल भरलेले बॅरेल ठेवले असल्याने आगीने चांगलाच भडका घेतला होता. उभ्या असलेल्या कारच्या बाजूला सायकलचे दुकान होते. दुकानातील आठ सायकली सुद्धा आगीत जळाल्याची माहिती आहे. परिसरातील लोकांनी कारला आग लागल्याचे लक्षात येताच अग्निशमन दलाला सूचना केली. आग विझविण्यासाठी तीन फायरब्रिगेडच्या गाड्या घटनास्थळी पोहचल्या. गाडीत डिझेलचे बॅरल असल्याने पाण्याचा परिणाम होत नव्हता. त्यामुळे फोम मारून आग विझविण्यात आली. घटनास्थळावरील लोकांच्या सांगण्यानुसार गाडीमधून डिझेलची अवैध विक्री केली जात होती.