कार उलटली, एकाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 1, 2021 04:08 AM2021-05-01T04:08:05+5:302021-05-01T04:08:05+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क कुही : वाहनाला ओव्हरटेक करण्याच्या नादात चालकाचा ताबा सुटला आणि वेगात असलेली कार राेडलगतच्या नालीत उलटली. ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
कुही : वाहनाला ओव्हरटेक करण्याच्या नादात चालकाचा ताबा सुटला आणि वेगात असलेली कार राेडलगतच्या नालीत उलटली. यात एकाचा मृत्यू झाला, तर दाेघे जखमी झाले. ही घटना कुही पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील डाेंगरगाव शिवारात बुधवारी सायंकाळी ६.३० वाजताच्या सुमारास घडली.
मीलन गाेविंदराव मेहर (४०, रा. नागपूर) असे मृताचे नाव आहे. गाेलू ठाकरे (रा. नागपूर) असे गंभीर जखमीचे, तर जयपाल माणिकराव शिवणकर (रा. पारडी, नागपूर) असे किरकाेळ जखमी कारचालकाचे नाव आहे. हे तिघेही एमएच ३१/ईयू-०२३७ क्रमांकाच्या कारने जात हाेते.
जयपालने डाेंगरगाव शिवारात समाेर असलेल्या वाहनाला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला. यातच त्याचा कारवरील ताबा सुटला आणि ती कार राेडलगतच्या नालीत शिरल्याने उलटली. यात मीलन मेहर यांना गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर गाेलूच्या डाेके व उजव्या पायाला गंभीर दुखापत झाली. जयपाल मात्र किरकाेळ जखमी झाला. माहिती मिळताच पाेलिसांनी घटनास्थळ गाठून दाेन्ही जखमींना उपचारासाठी दाखल केले. मीलनचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी नागपूर येथील शासकीय रुग्णालयात पाठविला. याप्रकरणी कुही पाेलिसांनी कारचालक जयपालविरुद्ध भादंविचे कलम २७९, ३३७, ३३८, ३०४ (अ) अन्वये गुन्हा नाेंदविला. या घटनेचा तपास पाेलीस उपनिारीक्षक भारत थिटे करीत आहेत.