दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2021 04:07 AM2021-06-18T04:07:47+5:302021-06-18T04:07:47+5:30

राज्याच्या शालेय शिक्षण व राज्य शैक्षणिक संशोधन परिषद पुणे यांच्या संयुक्त प्रयत्नातून हा कार्यक्रम सुरू करण्यात आला आहे. मागील ...

Career guidance for 10th, 12th grade students | दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन

दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन

googlenewsNext

राज्याच्या शालेय शिक्षण व राज्य शैक्षणिक संशोधन परिषद पुणे यांच्या संयुक्त प्रयत्नातून हा कार्यक्रम सुरू करण्यात आला आहे. मागील वर्ष ऑनलाईन क्लासेसचे व कोरोना संसर्गाची भीती कायम असल्याने ऑनलाईनच्या माध्यमातून करिअरचे धडे मिळावेत यासाठी हा पुढाकार घेण्यात आला आहे. दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना करिअरच्या विविध विषयांचे मार्गदर्शन विद्यार्थी व पालक हे ऑनलाईन वेबिनार एससीईआरटी महाराष्ट्र या युट्युब चॅनेलवर पाहू शकणार आहेत.

- वेबीनारचे स्वरूप

जून महिन्यात १६, २३ व ३० तारखेला होणाऱ्या वेबिनारमध्ये स्वत:ची ओळख, आवड, छंद व करिअर निवड यासोबतच मानसिक आरोग्याची भूमिका हे विषय समाविष्ट आहेत. जुलै महिन्याच्या ७, १४, २१ व २८ तारखेला होणाऱ्या वेबिनारमध्ये अनुक्रमे, कला, वाणिज्य, वैद्यकीय व तंत्र शिक्षण शाखेतील करिअरविषयी माहिती दिली जाईल. ऑगस्टच्या ४, ११, १८ व २५ तारखेच्या वेबिनारमध्ये अनुक्रमे ललितकला, मंचीयकला, पर्यावरण व संशोधन क्षेत्रातील करिअरविषयी तर १, ८, १५ व २२ सप्टेंबरला होणाऱ्या वेबिनारमध्ये संरक्षण, स्पर्धा परीक्षा, खेळ व पर्यटनातील संधीची माहिती दिली जाणार आहे.

Web Title: Career guidance for 10th, 12th grade students

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.