चिखली येथे काेराेना प्रतिबंधक लसीकरण शिबिर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2021 04:08 AM2021-05-18T04:08:37+5:302021-05-18T04:08:37+5:30
काटाेल : तालुक्यातील चिखली (मैना) येथे स्थानिक जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत काेराेना प्रतिबंधक लसीकरण शिबिराचे नुकतेच आयाेजन करण्यात आले. ...
काटाेल : तालुक्यातील चिखली (मैना) येथे स्थानिक जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत काेराेना प्रतिबंधक लसीकरण शिबिराचे नुकतेच आयाेजन करण्यात आले. यात चिखली (मैना) व गाेन्ही येथील नागरिकांना लसीकरणाचे महत्त्व पटवून देत त्यांचे लसीकरण करण्यात आले.
या शिबिरात गाेन्ही येथील ३६ तर चिखली (मैना) येथील ३८ अशा एकूण ७४ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. नागरिकांना मनात भीती न बाळगता ही लस घेण्याचे तसेच ज्यांनी ही लस घेतली आहे, त्यांनी लस घेण्यासाठी इतरांना प्रेरित करावे, असे आवाहनही या शिबिरात करण्यात आले. याप्रसंगी गोन्ही-चिखलीचे सरपंच विनोद काळे, डॉ. विनी भुजाडे, एन. डी. मेघे, एल. एस. कसरे, ग्रामसेवक सुनीता पाटील, नेगे, नीळकंठ टेकाडे, धीरज लाल, रघुनाथ धवड, सतीश काळे, पंजाब पाटील, योगराज दुपारे, वीरेन पडोलिया, आशासेविका शीला शेंडे, रंजना खडसे आदी उपस्थित होते.