काेराेना ‘सुपर स्प्रेडर’वर गुन्हे दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2021 04:07 AM2021-05-15T04:07:58+5:302021-05-15T04:07:58+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क माेवाड : शहरातील काेराेना रुग्णांची वाढती संख्या आणि जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांच्या आदेशान्वये माेवाड नगर परिषद ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
माेवाड : शहरातील काेराेना रुग्णांची वाढती संख्या आणि जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांच्या आदेशान्वये माेवाड नगर परिषद प्रशासनाने मुक्तसंचार करणाऱ्या तीन काेराेना रुग्णांवर दंडात्मक कारवाई करीत त्याच्या विराेधात गुन्हे दाखल केले आहे. शिवाय, नगरपालिका व पाेलीस प्रशासनाने शहरात विनाकारण फिरणाऱ्यावर नजर ठेवली आहे.
मुख्याधिकारी पल्लवी राऊत यांच्या नेतृत्वातील पथक काेराेना रुग्णांच्या घरी जाऊन त्यांची चाैकशी करीत आहेत. यात रुग्णांच्या तब्बेतीमधील सुधारणा व इतर बाबी जाणून घेतल्या जात आहेत. शिवाय, त्यांना घराबाहेर न पडण्याचा व काळजी घेण्याचा सल्ला देत आहेत. काही रुग्ण वारंवार सूचना देऊनही फिरत असल्याने सुपर स्प्रेडर बनले आहेत. त्यांना आळा घालण्यासाठी त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करीत गुन्हे दाखल केले जात आहेत.
अत्यावश्यक वस्तूंची दुकाने राेेज सकाळी ७ ते ११ या काळात सुरू ठेवण्याचे निर्देश देण्यात आले असून, याचे उल्लंघन करणाऱ्या दुकानदारांवर दंडात्मक कारवाई केली जात आहे. यात माेवाड शहरातील दोन कपडा व्यावसायिक, दोन हार्डवेअर दुकानदार व एका सलून दुकानदाराचा समावेश आहे. पालिका प्रशासनाच्या या माेहिमेमुळे नागरिकांना दिलासा मिळाला असून, अनेकांनी समाधान व्यक्त केले आहे.
...
११३ ॲक्टिव्ह रुग्ण
नगर पालिका प्रशासनाच्या या कारवाईमुळे माेवाड शहरातील काेराेना रुग्णांनी घराबाहेर पडणे व सार्वजनिक ठिकाणी येणे बंद केले आहे. शहरात शुक्रवारी (दि. १४) आठ नवीन रुग्णांची नाेंद करण्यात आल्याने शहरातील ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या ११३ झाली आहे. पालिका प्रशासनाच्यावतीने माेवाड प्राथमिक आराेग्य केंद्रात पाच खाटांची अतिरिक्त व्यवस्था केली आहे. जे रुग्ण नियमांचे पालन करणार नाही, त्यांना सक्तीने प्राथमिक आराेग्य केंद्रात भरती केले जाणार असल्याची माहिती मुख्याधिकारी पल्लवी राऊत यांनी दिली.