रामटेक, उमरेडमध्येही काेराेना संक्रमण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2021 04:08 AM2021-04-14T04:08:54+5:302021-04-14T04:08:54+5:30
उमरेड तालुक्यात मंगळवारी ८७ नवीन कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली. यात शहरातील ५४ तर ग्रामीण भागातील ३३ रुग्णांचा समावेश ...
उमरेड तालुक्यात मंगळवारी ८७ नवीन कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली. यात शहरातील ५४ तर ग्रामीण भागातील ३३ रुग्णांचा समावेश आहे. हिंगणा तालुक्यात ५३ नवीन रुग्ण आढळून आले. यात वानाडोंगरी शहरातील २०, हिंगणा शहरातील ७, डिगडोह व शिरूर येथील प्रत्यकी ४, नीलडोह व टाकळघाट येथील प्रत्येकी ३, टेंभरी व इसासनी येथील प्रत्येकी २, खापरी (गांधी) व गिरोला येथील प्रत्येकी १ पाॅझिटिव्ह आहे. तालुक्यात एकूण रुग्णसंख्या ८,००८ झाली असून, ५५०९ रुग्ण काेराेनामुक्त झाले तर १५२ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
कुही तालुक्यांत ९९ रुग्णांची नाेंद करण्यात आली. मांढळ प्राथमिक आराेग्य केंद्रांतर्गत १२४ नागरिकांच्या टेस्ट करण्यात आल्या असून, यातील ३३ जणांना काेराेनाची लागण झाल्याचे आढळून आले. वेलतूर प्राथमिक आराेग्य केंद्रात ८३ जणांची टेस्ट करण्यात आली असून, यातील ४०, साळवा प्राथमिक आराेग्य केंद्रात ५३ जणांच्या टेस्ट केल्या असून, यातील १६ तर तितूर प्राथमिक आराेग्य केंद्रात ३० जणांच्या टेस्ट केल्या असून, यातील १० जणांना काेराेेनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे.