ग्रामीण भागात काेराेना संक्रमण कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2021 04:10 AM2021-03-01T04:10:01+5:302021-03-01T04:10:01+5:30

लाेकमत न्यूज नेटवर्क सावनेर/काटाेल/नरखेड/कळमेश्वर/रामटेक : नागपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात दुसऱ्या टप्प्यातील काेराेनाचे संक्रमण हळूहळू वाढत आहे. जिल्ह्यातील विविध ठिकाणी ...

Carina infection persists in rural areas | ग्रामीण भागात काेराेना संक्रमण कायम

ग्रामीण भागात काेराेना संक्रमण कायम

googlenewsNext

लाेकमत न्यूज नेटवर्क

सावनेर/काटाेल/नरखेड/कळमेश्वर/रामटेक : नागपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात दुसऱ्या टप्प्यातील काेराेनाचे संक्रमण हळूहळू वाढत आहे. जिल्ह्यातील विविध ठिकाणी रविवारी (दि. २८) करण्यात आलेल्या टेस्टमध्ये सावनेर व काटाेल तालुक्यात प्रत्येकी ३१ काेराेना संक्रमित नवीन रुग्ण आढळून आले असून, नरखेड तालुक्यात १४, कळमेश्वर तालुक्यात १३, तर रामटेक तालुक्यात चार नवीन रुग्णांची नाेंद करण्यात आली. या वाढत्या संक्रमणावर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रत्येकाने काेराेना प्रतिबंधक उपाययाेजनांचे काटेकाेर पालन करणे गरजेचे आहे.

सावनेर तालुक्यात काेराेनाच्या रुग्णांमध्ये वाढ हाेताना दिसून येत आहे. सावनेर शहरासह तालुक्यात रविवारी ३१ रुग्णांची भर पडली. यात सावनेर शहरातील १७ रुग्णांसह तालुक्यातील खापा शहरातील पाच, केळवद व एसईबी काॅलनीतील प्रत्येकी तीन तसेच भागेमाहरी, मंगसा व नागपूर येथील प्रत्येकी एका रुग्णांचा समावेश आहे.

काटाेल तालुक्यातील विविध ठिकाणी रविवारी ९४ नागरिकांची काेराेना टेस्ट करण्यात आली असून, त्यात ३१ जण काेराेना संक्रमित असल्याचे स्पष्ट झाले. यात २९ रुग्ण काटाेल शहरातील असून, दाेघे ग्रामीण भागातील आहेत. काटाेल शहरातील पंचवटी व रामदेवबाबा लेआउटमध्ये प्रत्येकी पाच रुग्ण आढळून आले असून, सरस्वतीनगर व आययुडीपी येथे प्रत्येकी तीन, दोडकीपुरा, होळी मैदान, नबीरा लेआउट येथे प्रत्येकी दोन तर रेल्वेस्थानक परिसर, धवड लेआउट, तीनखेडे लेआउट, शारदा चौक, राठी लेआउट, गळपुरा, जानकीनगर येथे प्रत्येकी एक रुग्ण आढळून आला आहे. शिवाय, तालुक्यातील खानगाव व गोंडीमोहगाव येथील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे.

Web Title: Carina infection persists in rural areas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.