बडेगाव परिसरात काेराेनाचा उद्रेक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2021 04:10 AM2021-03-26T04:10:38+5:302021-03-26T04:10:38+5:30

लाेकमत न्यूज नेटवर्क बडेगाव : बडेगाव (ता. सावनेर) प्राथमिक आराेग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या गावांमध्ये काेराेना रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ हाेत आहे. ...

Carina outbreak in Badegaon area | बडेगाव परिसरात काेराेनाचा उद्रेक

बडेगाव परिसरात काेराेनाचा उद्रेक

Next

लाेकमत न्यूज नेटवर्क

बडेगाव : बडेगाव (ता. सावनेर) प्राथमिक आराेग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या गावांमध्ये काेराेना रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ हाेत आहे. या गावांमध्ये राेज २० ते ३० नवीन रुग्णांची भर पडत असून, ही साखळी खंडित करण्यासाठी बडेगाव येथील ग्रामपंचायत कार्यालयात तातडीने बैठकही घेण्यात आली. या बैठकीत उपाययाेजनांच्या अंमलबजावणीवर विचारविनिमय करण्यात आला.

या प्राथमिक आराेग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या बडेगाव, टेंभूरडोह, कोच्छी, खर्डुका, खुबाळा, रायवाडी, सिरोंजी, कोथुळणा व खैरी या गावांमध्ये काेराेना संक्रमण व रुग्णांची संख्या इतर गावांच्या तुलनेत अधिक आहे. दरम्यान, ही साखळी खंडित करण्यासाठी जिल्हा परिषद सदस्य छाया बनसिंगे यांनी गुरुवारी (दि. २५) बडेगाव ग्रामपंचायत कार्यालयात बैठक आयाेजित केली हाेती. या बैठकीत बडेगाव परिसरात पाेलीस चाैकी तयार करणे, दुकानदार, व्यापारी व व्यावसायिकांची काेराेना टेस्ट करणे, टेस्ट न केल्यास दुकाने व व्यापारी प्रतिष्ठाने उघडण्यास त्यांना मज्जाव करणे, गावात गर्दी करणाऱ्यांवर तसेच फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन न करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करणे, ग्रामसेवकांनी त्यांच्या गावांमध्ये काेराेना प्रतिबंधक उपाययाेजनांचे काटेकाेर पालन करणे, यात हयगय करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर साथराेग नियंत्रण कायद्यान्वये कारवाई करणे, प्राथमिक आरोग्य केंद्रात येणारे साधारण रुग्ण, लसीकरणासाठी आलेले नागरिक आणि कोरोना तपासणीसाठी आलेले नागरिक यांच्यासाठी वेगवेगळ्या कक्षाची व्यवस्था करण्यात यावी, आदी उपाययाेजना करण्याचे निर्देश या बैठकीत संबंधितांना देण्यात आले.

या उपाययाेजनांची अधूनमधून आकस्मिक पाहणी केली जाणार असल्याचेही जिल्हा परिषद सदस्य छाया बनसिंगे यांनी सांगितले. काेराेना रुग्णांमध्ये वाढ हाेत असल्याने लस घेणाऱ्या नागरिकांची संख्या झपाट्याने कमी झाली आहे, अशी माहिती वैद्यकीय अधिकारी जुनैद अन्सारी यांनी दिली. लसीकरणासाठी नागरिकांना प्रेरित करण्याचे व सर्वांनी युद्धपातळीवर सहकार्य करण्याचे आवाहन सहायक खंडविकास अधिकारी दीपक गरुड यांनी केले.

या बैठकीला छाया बनसिंगे, डाॅ. जुनैद अन्सारी, दीपक गरुड यांच्यासह पंचायत समिती सदस्य भावना चिखले, सरपंच कविता कराळे, कृषी अधिकारी पी.एस. गाडे, पोलीस पाटील अरविंद नवले, मुख्याध्यापक एस.एस. तभाने, सिद्धार्थ शेंडे, आरोग्यसेवक डी.बी. बोडखे तसेच सर्व ग्रामपंचायत सदस्य, आशासेविका, अंगणवाडी सेविका व काही नागरिक उपस्थित हाेते.

...

दाेघांचा उपचारादरम्यान मृत्यू

बडेगाव प्राथमिक आराेग्य केंद्रांतर्गत बुधवार(दि. २४)पर्यंत १,५९० जणांची आरटीपीसीआर टेस्ट करण्यात आली असून, यातील १२२ जण पाॅझिटिव्ह आढळून आले. २,५४४ जणांची रॅपिड ॲन्टिजेन टेस्ट करण्यात आली असून, त्यातील २०४ जणांना काेराेनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. यातील १८० रुग्णांनी काेराेनावर मात केली आहे. शिवाय, दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला तर तिघांवर नागपूर शहरातील मेडिकल हाॅस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. इतर १४१ जणांना गृहविलगीकरणात ठेवण्यात आले असून, त्यांच्यावर औषधाेपचार सुरू आहे, अशी माहिती वैद्यकीय अधिकारी डाॅ. जुनैद अन्सारी यांनी दिली.

Web Title: Carina outbreak in Badegaon area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.