काेराेना प्रतिबंधक लसीकरण शिबिर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2021 04:08 AM2021-05-15T04:08:27+5:302021-05-15T04:08:27+5:30
वाडी : नजीकच्या हुडकेश्वर (खुर्द) (ता. नागपूर ग्रामीण) येथील ग्रामपंचायत प्रशासनाच्या वतीने आराेग्य उपकेंद्रात काेराेना प्रतिबंधक लसीकरण शिबिराचे नुकतेच ...
वाडी : नजीकच्या हुडकेश्वर (खुर्द) (ता. नागपूर ग्रामीण) येथील ग्रामपंचायत प्रशासनाच्या वतीने आराेग्य उपकेंद्रात काेराेना प्रतिबंधक लसीकरण शिबिराचे नुकतेच आयाेजन करण्यात आले हाेते. या शिबिरात ४५ वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण करण्यात आले.
काेराेना प्रतिबंधक लसीबाबत काही चुकीची माहिती प्रसृत करून गैरसमज निर्माण केला जात आहे. त्यामुळे नागरिकांनी या चुकीच्या माहिती व अफवांवर विश्वास ठेवू नये. ही लस सुरक्षित असून, प्रत्येकाने भीती न बाळगता लसीकरण करवून घ्यावे, असे आवाहन सरपंच मीना शेंडे यांनी केले. यावेळी जिल्हा परिषदेचे सदस्य सुभाष गुजर, सरपंच मीना शेंडे, वैद्यकीय अधिकारी डाॅ. डोंगरवार, माजी सरपंच कमलाकर शेंडे, उपसरपंच अभय भगत, सचिन घोडे, ग्रामपंचायत सदस्य रूपा परतेकी, शिल्पा पाटील, सीमा कास्टे, प्रियंका घडेकर, ईश्वर मसराम उपस्थित होते.