भीतीपाेटी काेराेना टेस्ट, लसीकरणाकडे पाठ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2021 04:08 AM2021-04-24T04:08:38+5:302021-04-24T04:08:38+5:30
कैलास निघाेट लाेकमत न्यूज नेटवर्क देवलापार : रामटेक तालुक्यातील आदिवासीबहुल भाग असलेल्या देवलापार परिसरात काेराेना संक्रमण झपाट्याने वाढत आहे. ...
कैलास निघाेट
लाेकमत न्यूज नेटवर्क
देवलापार : रामटेक तालुक्यातील आदिवासीबहुल भाग असलेल्या देवलापार परिसरात काेराेना संक्रमण झपाट्याने वाढत आहे. या भागात गुरुवार (दि. २१)पर्यंत एकूण १,३८२ काेराेना रुग्णांची नाेंद करण्यात आली हाेती. यातील ५९३ रुग्णांनी काेराेनावर मात केली असून, ७६२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. शिवाय, २७ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. या भागातील बहुतांश नागरिक काेराेना टेस्टसाेबतच लस घेण्यास धजावत नाहीत. त्यामुळे काेराेना संक्रमणाची मूळ दाहकता समाेर येत नाही. ही बाब सर्वांसाठी अत्यंत घातक असली तरी नागरिकांच्या मनातील भीती दूर करणार काेण, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला आहे.
काेराेना संक्रमण राेखण्यासाठी लस हा प्रभावी उपाय असल्याचे आवाहन प्रशासनाच्यावतीने केले जात असले तरी ग्रामीण भागातील नागरिक त्यावर सहसा विश्वास ठेवायला तयार नाहीत. या भागात देवलापार येथे ग्रामीण रुग्णालय तर करवाही व हिवरा बाजार येथे प्राथमिक आराेग्य केंद्र आहे. या तिन्ही ठिकाणी काेराेना टेस्ट व लसीकरणाची साेय करण्यात आली आहे. करवाही प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत ७५४ रुग्णांची नाेंद करण्यात आली असून, यातील ३१३ रुग्ण बरे झाले आहेत, तर ४२१ रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. त्यातील सात रुग्ण गंभीर असल्याने ते इतरत्र उपचार घेत आहे. या भागातील २० रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. हिवराबाजार प्राथमिक आरोग्य केद्रांतर्गत ६२८ रुग्ण आढळून आले. यातील २८० रुग्णांनी काेराेनावर मात केली असून, ३४१ रुग्ण उपचार घेत आहेत. चार रुग्ण गंभीर असल्याने त्यांच्यावर इतरत्र उपचार सुरू असून, सात रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
या भागातील रुग्णांवर उपचार करण्यासाठी देवलापार येथे काेविड केअर सेंटर सुरू करणे आवश्यक आहे. त्यासाठी ग्रामीण रुग्णालयासाेबत गोविज्ञान अनुसंधान केंद्र, तंत्र माध्यमिक शाळा, बेलदा येथील आश्रमशाळा व कट्टा येथील समाजभवनाचा वापर करता येऊ शकताे. देवलापार येथील ग्रामीण रुग्णालयात चार तसेच करवाही व हिवराबाजार येथील प्राथमिक आराेग्य केंद्रात प्रत्येकी दाेन असे एकूण आठ डाॅक्टर उपलब्ध आहेत. या भागात कमी अधिक प्रमाणात ऑक्सिजन सिलिंडरही उपलब्ध हाेऊ शकते.
या भागातील बहुतांश नागरिक काेराेना टेस्टविना खासगी डाॅक्टरांकडे जाऊन औषधाेपचार करवून घेत आहेत. खासगी डाॅक्टरही त्यांना टेस्ट करण्याचा सल्ला न देता त्यांच्याकडून अतिरिक्त पैसे वसूल करीत आहेत. पूर्वी ९० रुपये तपासणी फी घेणारे डाॅक्टर आता २५० रुपये फी घेत आहेत. या प्रकारात खासगी डाॅक्टर व औषधी विक्रेते मालामाल हात आहेत. टेस्ट न करता करण्यात येणारा औषधाेपचार जीवघेणा ठरण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी भीती न बाळगता टेस्ट करून औषधे घ्यावी, असे आवाहन आराेग्य प्रशासनाने केले आहे.
....
काेविड केअर सेंटरची प्रतीक्षा कायम
या भागात एक ग्रामीण रुग्णालय व दाेन प्राथमिक आराेग्य केंद्रे असली तरी काेराेना रुग्णांवर वेळीच उपचार करण्याची काेणतीही सुविधा व साधने नाहीत. त्यामुळे या भागातील रुग्णांना उपचारासाठी रामटेक, कामठी अथवा नागपूरला न्यावे लागते. या शहरांमधील शासकीय व खासगी रुग्णालयांमध्ये खाटा व ऑक्सिजनची कमतरता रुग्णांना नाइलाजास्तव परत आणावे लागते. ही बाब रुग्णांसह इतरांसाठी धाेकादायक ठरणारी असल्याने या भागातील काेराेना संक्रमण व मृत्युदर कमी करण्यासाठी देवलापार येथे काेविड केअर सेंटर सुरू करणे गरजेचे आहे.
...
ग्रामीण रुग्णालय याेग्य
काेविड केअर सेंटरसाठी याेग्य जागाही देवलापार येथे उपलब्ध आहे, शिवाय या भागात रुग्णांवर उपचार करण्यासाठी डाॅक्टरही उपलब्ध हाेऊ शकतात. देवलापार येथील ग्रामीण रुग्णालयात अलीकडच्या काळात एकही रुग्ण दाखल करण्यात आला नाही. दुसरीकडे खासगी डाॅक्टरांकडे रुग्णांचा ओघ वाढला आहे. या रुग्णालयाच्या आवारात ५० क्वाॅर्टर असून, त्यातील ८० टक्के क्वार्टर रिकामे आहेत. या रुग्णालयात काही मूलभूत सुविधा असल्याने याचा वापर काेविड केअर सेंटरसाठी हाेऊ शकताे.
...
लक्षणे आढळून येताच संबंधित व्यक्तीने चाचणी करवून घेणे जितके गरजेचे आहे, तितकेच लसीकरण करून घेणे महत्त्वाचे आहे. लस घेतल्याने शरीरात प्रतिकारशक्ती तयार हाेते. त्यामुळे काेराेनाची लागण हाेण्याची शक्यता कमी हाेते. लागण झाली तरी रुग्ण गंभीर न हाेता साध्या व साेप्या उपचाराने बरा हाेतो. त्यामुळे नागरिकांनी न घाबरता टेस्ट करवून घ्यावी, शिवाय लस घ्यावी.
- डाॅ. चेतन नाईकवार, तालुका आराेग्य अधिकारी, रामटेक.