विनाकारण फिरणाऱ्यांची काेराेना चाचणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2021 04:09 AM2021-05-22T04:09:17+5:302021-05-22T04:09:17+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क कुही : काेराेना संक्रमण काळात कुही शहरासह ग्रामीण भागात विनाकारण फिरणाऱ्यांची संख्या काही कमी हाेताना दिसून ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
कुही : काेराेना संक्रमण काळात कुही शहरासह ग्रामीण भागात विनाकारण फिरणाऱ्यांची संख्या काही कमी हाेताना दिसून येत नाही. त्यात काेण काेराेना संक्रमित आहे आणि काेण नाही, हे कळायला मार्ग नसताे. शिवाय, नागरिक स्वत:हून काेराेना टेस्ट करवून घेत नाही. त्यामुळे मांढळ (ता. कुही) प्राथमिक आराेग्य केंद्र आणि कुही पाेलीस ठाण्याच्या संयुक्त विद्यमाने मांढळ येथे विनाकारण फिरणाऱ्यांसह नागरिकांना अत्यावश्यक सेवा देणाऱ्यांची सक्तीने काेराेना टेस्ट करण्याची माेहीम हाती घेण्यात आली आहे. पहिल्या दिवशी मांढळ येथील बसस्थानक चाैकात ही माेहीम पार पडली.
राेज सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंत दुकाने व बाजारपेठ सुरू राहत असल्याने या काळात घराबाहेर पडणाऱ्या नागरिकांची संख्याही अधिक असते. त्यामुळे प्रशासनाने सकाळी ७ वाजतापासून स्थानिक व बाहेरगावाहून आलेल्या नागरिकांची चाैकशी करीत त्यांची सक्तीने अँटिजन टेस्ट करायला सुरुवात केली. यात कामानिमित्त व विनाकारण फिरणाऱ्यांसह नागरिकांना अत्यावश्यक सेवा प्रदान करणाऱ्यांचीही टेस्ट करण्यात आली. यावेळी नागरिक व दुकानदार अशा एकूण १०० जणांचे स्वॅब घेण्यात आल्याची माहिती प्राथमिक आराेग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डाॅ. रचना नागदेवे यांनी दिली असून, यात एकही व्यक्ती काेराेना पाॅझिटिव्ह आढळून आला नाही, असेही त्यांनी सांगितले. यावेळी नागरिकांना काेराेना प्रतिबंधक उपाययाेजना व लसीकरणाचे महत्त्व पटवून देण्यात आले तसेच विनामास्क फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करीत त्यांच्याकडून दंडही वसूल करण्यात आला. या उपक्रमामुळे विनाकारण घराबाहेर पडणाऱ्या व फिरणाऱ्यांमध्ये वचक निर्माण झाला असल्याचेही दिसून आले. या माेहिमेत डॉ. रचना नागदेवे, सरपंच शाहू कुलसंगे, उपसरपंच सुखदेव जीभकाटे, ग्रामविकास अधिकारी विजय बांते, परिचारिका स्वाती सांगोडे, पोलीस उपनिरीक्षक अनिल देरकर, बीट जमादार अरुण कावळे, शिपाई समाधान पवार, ग्रामपंचायत सदस्य राजेश तिवसकर, धनपाल लोहारे, प्रदीप कुलरकर, संजय निरगुळकार, मोना बुद्धे, गीता सोनकुसरे, संगीता निरगुळकार यांच्यासह प्राथमिक आराेग्य केंद्र व ग्रामपंचायत कर्मचारी सहभागी झाले हाेते.