विनाकारण फिरणाऱ्यांची काेराेना चाचणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2021 04:08 AM2021-05-29T04:08:27+5:302021-05-29T04:08:27+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क कन्हान : काेराेना संक्रमण राेखण्यासाठी वारंवार सूचना देऊनही काही नागरिक विनाकारण फिरत असतात. त्यामुळे आराेग्य व ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
कन्हान : काेराेना संक्रमण राेखण्यासाठी वारंवार सूचना देऊनही काही नागरिक विनाकारण फिरत असतात. त्यामुळे आराेग्य व पाेलीस विभागाच्या वतीने कन्हान (ता. पारशिवनी) शहरात विनाकारण फिरणाऱ्यांची काेराेना चाचणी करण्याची माेहीम सुरू करण्यात आली. या माेहिमेच्या पहिल्या दिवशी २८ जणांची चाचणी करण्यात आली, अशी माहिती कन्हान प्राथमिक आराेग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डाॅ. योगेश चौधरी यांनी दिली.
विनाकारण फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याची माेहीमही प्रशासनाने सुरू केली हाेती. मात्र, त्यांच्यावर फारसा परिणाम झाला नाही. त्यामुळे काेराेचा चाचणी माेहीम सुरू करण्यात आली असून, यासाठी पाेलीस व आराेग्य विभागाने माेबाइल बूथ तयार केले आहेत. दरम्यान, गुरुवारी (दि. २७) कन्हान शहरातील तारसा चाैक येथे पाेलीस कर्मचाऱ्यांनी विनाकारण फिरणाऱ्या २८ जणांना थांबविले. त्यांच्या आराेग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी ॲंटिजन टेस्ट केली. यात कुणीही पाॅझिटिव्ह आढळून आले नाही, अशी माहिती डाॅ. याेगेश चाैधरी यांनी दिली.
ही माेहीम विनाकारण फिरणाऱ्यांना आळा घालण्यासाठी तसेच काेराेना संक्रमण राेखण्यासाठी राबविण्यात येत असून, दंडात्मक कारवाई केली जात आहे, अशी माहिती ठाणेदार अरुण त्रिपाठी यांनी दिली. या माेहिमेत डाॅ. याेगेश चाैधरी, ठाणेदार अरुण त्रिपाठी यांच्यासह सुरेंद्र गिरे, राजेंद्र गौतम, जयलाल सहारे, वीरेंद्रसिंग चौधरी, मुकेश जयस्वाल सहभागी होते.
===Photopath===
280521\img_20210528_173523.jpg
===Caption===
अनावश्यक फिरणाऱ्या 28 जणांची कोविड चाचणी