काेराेना संक्रमण आलेख उतरला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2021 04:08 AM2021-05-16T04:08:32+5:302021-05-16T04:08:32+5:30

लाेकमत न्यूज नेटवर्क कळमेश्वर/उमरेड/नरखेड/काटाेल/सावनेर/हिंगणा/कुही/रामटेक : नागपूर शहरासह ग्रामीण भागात शनिवारी (दि. १५) १,१५० रुग्णांची नाेंद करण्यात आली असून, यात ...

Carina transition graph landed | काेराेना संक्रमण आलेख उतरला

काेराेना संक्रमण आलेख उतरला

Next

लाेकमत न्यूज नेटवर्क

कळमेश्वर/उमरेड/नरखेड/काटाेल/सावनेर/हिंगणा/कुही/रामटेक : नागपूर शहरासह ग्रामीण भागात शनिवारी (दि. १५) १,१५० रुग्णांची नाेंद करण्यात आली असून, यात ग्रामीण भागातील ७२४ रुग्णांचा समावेश आहे. कळमेश्वर तालुक्यात ७७ रुग्णांची नाेंद करण्यात आली असून, उमरेडमध्ये ५२, नरखेडमध्ये ५०, काटाेलमध्ये ३०, सावनेर तालुक्यात २९, हिंगणा व कुही तालुक्यात प्रत्येकी २१ तर रामटेक तालुक्यात १० नवीन रुग्ण आढळून आले आहेत.

जिल्ह्यात सर्वाधिक ७७ रुग्ण कळमेश्वर तालुक्यात आढळून आले आहेत. यात कळमेश्वर-ब्राह्मणी शहरातील २१ तर तालुक्यातील विविध गावांमधील ५६ रुग्णांचा समावेश आहे. उमरेड तालुक्यात ५२ नवीन रुग्णांची नाेंद करण्यात आली. यात उमरेड शहरातील ११ तर ग्रामीण भागातील ४१ रुग्ण आहेत. नरखेड तालुक्यात ५० रुग्ण आढळून आले आहेत. यात नरखेड शहरातील सहा तर ग्रामीण भागातील ४४ रुग्णांचा समावेश आहे. तालुक्यातील सावरगाव प्राथमिक आराेग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या गावांमध्ये सात, जलालखेडा प्राथमिक आराेग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या गावांमध्ये ३३, मेंढला प्राथमिक आराेग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या गावांमध्ये तीन तर माेवाड प्राथमिक आराेग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या गावांमध्ये एक काेराेना संक्रमित रुग्ण आढळून आला आहे. परिणामी, तालुक्यातील काेराेना पाॅझिटिव्ह रुग्णांची एकूण संख्या ३,००८ झाली असून, यात २,४९७ रुग्ण ग्रामीण भागातील तर ५०१ रुग्ण नरखेड शहरातील आहेत. यातील १,६०३ रुग्णांनी काेराेनावर मात केली केली असून, सध्या तालुक्यात काेराेनाचे १,४०५ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

Web Title: Carina transition graph landed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.