बुटीबोरी येथे काेराेना लसीकरण साेय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2021 04:07 AM2021-03-22T04:07:54+5:302021-03-22T04:07:54+5:30
बुटीबाेरी : शहरासह परिसरात लाेकसंख्येची घनता अधिक असून, या भागात काेराेना लसीकरणाची साेय नसल्याने नागरिकांची गैरसाेय व्हायची. ही समस्या ...
बुटीबाेरी : शहरासह परिसरात लाेकसंख्येची घनता अधिक असून, या भागात काेराेना लसीकरणाची साेय नसल्याने नागरिकांची गैरसाेय व्हायची. ही समस्या लक्षात घेता बुटीबाेरी येथे लसीकरणाची साेय करण्यात आली असून, आज, साेमवारपासून लसीकरणाला सुरुवात हाेणार असल्याची माहिती जिल्हा आराेग्याधिकारी डाॅ. हेमके यांनी दिली.
दुसऱ्या टप्प्यात या भागात काेराेना रुग्णांची संख्या वाढत आहे. बुटीबाेरी व परिसरातील ज्येष्ठ नागरिकांना काेराेना लसीकरणासाठी आठ किलोमीटर अंतरावर असलेल्या बाेरखेडी येथील प्राथमिक आराेग्य केंद्रात किंवा सातगाव (कन्हाळगाव) आराेग्य केंद्रात जावे लागायचे. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना त्रास व्हायचा. ही समस्या साेडविण्यासाठी नगराध्यक्ष बबलू गाैतम यांनी जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांच्याशी चर्चा करून बुटीबाेरी येथे लसीकरणाची साेय करावी, अशी मागणीही केली हाेती. त्या अनुषंगाने जिल्हा आराेग्याधिकारी डाॅ. हेमके यांनी शनिवारी (दि. २०) बुटीबाेरी येथील जुन्या वसाहतीत असलेल्या आराेग्य केंद्राची पाहणी करीत उपाययाेजनांचा आढावा घेतला. शिवाय, या ठिकाणी आज, साेमवारपासून काेराेना लसीकरणाला सुरुवात करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले. यावेळी नगराध्यक्ष बबलू गौतम, पालिकेचे मुख्याधिकारी राजेंद्र चिखलखुंदे, उपाध्यक्ष व बांधकाम सभापती अविनाश गुर्जर, शिक्षण सभापती विनोद लोहकरे यांच्यासह आराेग्य विभागाचे कर्मचारी उपस्थित हाेते.