कार्लस्रू पर्यावरणपूरक वाहतूक प्रकल्प लाभकारक : अभिजित बांगर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2018 01:28 AM2018-11-29T01:28:51+5:302018-11-29T01:29:18+5:30

कार्लस्रू शहरातील पर्यावरणपूरक वाहतूक व्यवस्था नागरिकांच्या आरोग्यासाठी लाभदायक आहे. तशा प्रकारची वाहतूक व्यवस्था भविष्यात नागपुरात अस्तित्वात आली तर नागपूर देशासाठी आदर्श ठरेल. स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत ‘सिटी टू सिटी पेअरिंग’च्या दोन्ही शहरांतील उत्तम प्रकल्पांची देवाणघेवाण होते. कार्लस्रूमधील चांगले प्रकल्प नागपुरात राबविण्यात येईल, असा विश्वास महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी व्यक्त केला.

Carlsru Environmental Transportation Project Beneficial: Abhijit Bangar | कार्लस्रू पर्यावरणपूरक वाहतूक प्रकल्प लाभकारक : अभिजित बांगर

कार्लस्रू पर्यावरणपूरक वाहतूक प्रकल्प लाभकारक : अभिजित बांगर

Next
ठळक मुद्देवाहतूक व्यवस्था: तर नागपूर देशासाठी आदर्श ठरेल

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कार्लस्रू शहरातील पर्यावरणपूरक वाहतूक व्यवस्था नागरिकांच्या आरोग्यासाठी लाभदायक आहे. तशा प्रकारची वाहतूक व्यवस्था भविष्यात नागपुरात अस्तित्वात आली तर नागपूर देशासाठी आदर्श ठरेल. स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत ‘सिटी टू सिटी पेअरिंग’च्या दोन्ही शहरांतील उत्तम प्रकल्पांची देवाणघेवाण होते. कार्लस्रूमधील चांगले प्रकल्प नागपुरात राबविण्यात येईल, असा विश्वास महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी व्यक्त केला.
स्मार्ट सिटीअंतर्गत असलेल्या ‘सिटी टू सिटी पेअरिंग’ कार्यक्रमांतर्गत नागपूर आणि जर्मनी यांच्यात झालेल्या करारानुसार कार्लस्रू येथील शिष्टमंडळ नागपुरात दाखल झाले आहे. नागपूर स्मार्ट अ‍ॅण्ड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कॉपोर्रेशन लिमिटेडतर्फे मोबीलाईज युअर सिटी या विषयावर महापालिका मुख्यालयातील आयुक्त कार्यालय सभागृहात आयोजित कार्यशाळेत ते बोलत होते. यावेळी एनएसएससीडीसीएलचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. रामनाथ सोनवणे, े मुख्य महाव्यवस्थापक राजेश दुफारे, विजय बनगीरवार, देवेंद्र महाजन, मेट्रोचे कार्यकारी संचालक (नियोजन) एस.के. सिंगला, सहमहाव्यवस्थापक महेश गुप्ता, वाहतूक पोलिस विभागाचे उपायुक्त राजतिलक रोशन, महापालिकेचे परिवहन व्यवस्थापक शिवाजी जगताप, वाहतूक अभियंता आसाराम बोदिले,रजनीश पोरवाल, जीटीचे प्रकल्प संचालक अरुण सेलवरसु, मनपाचे शहर अभियंता मनोज तालेवार उपस्थित होते. कार्लस्रू शिष्टमंडळात कार्लस्रूच्या इकॉनॉमिक डेव्हलपमेंट डिपार्टमेंटचे इनोव्हेशन हेड राफ ईकॉर्न ,कार्लस्रू डिजीटलचे स्टीफन आदी उपस्थित होते.
प्रारंभी रामनाथ सोनवणे यांनी नागपूर स्मार्ट सिटी प्रकल्पासंदर्भात सादरीकरण केले. सादरीकरण केले. शिष्टमंडळाने कार्लस्रू शहरात आवागमनासाठी सायकलचा उपयोग किती प्रभावीपणे केला जातो, प्रदूषणावर प्रतिबंध घालण्यासाठी त्याची कशी मदत होत आहे, याबाबत माहिती दिली.
महापालिका महामेट्रो, एनएमआरडीएच्या अधिकाऱ्यांनी प्रकाश टाकला. नागपूर महापालिकेच्या वाहतूक विभागाचे व्यवस्थापक शिवाजी जगताप यांनी नागपूर मनपाच्या परिवहन सेवेची माहिती दिली. परिवहन अभियंता आसाराम बोदिले यांनी नागपूर शहरातील परिवहन व्यवस्थेच्या व्यापक नियोजनावर सादरीकरण केले. महामेट्रोच्या वतीने सहमहाव्यवस्थापक महेश गुप्ता यांनी बाईक शेअरिंग प्रकल्पावर सादरीकरण केले.अभिजीत बांगर यांनी कार्लस्रूच्या शिष्टमंडळासोबत चर्चा केली. गुरुवारीही विविध प्रकल्पांचे सादरीकरण होणार आहे.

Web Title: Carlsru Environmental Transportation Project Beneficial: Abhijit Bangar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.