अंगणवाडी सेविकेच्या मदतीला ‘कॅस’ : प्रत्येक अंगणवाडी ऑनलाईन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2019 10:30 PM2019-09-10T22:30:29+5:302019-09-10T22:32:56+5:30

पोषण अभियानाला गती देण्यासाठी शासनाने कॉमन अप्लिकेशन सॉफ्टवेअर (कॅस)ची निर्मिती केली आहे; सोबतच सर्व सेविकांना स्मार्ट फोन उपलब्ध करून दिला आहे.

CAS Helping for Anganwadi Sevica : Every Anganwadi Online | अंगणवाडी सेविकेच्या मदतीला ‘कॅस’ : प्रत्येक अंगणवाडी ऑनलाईन

अंगणवाडी सेविकेच्या मदतीला ‘कॅस’ : प्रत्येक अंगणवाडी ऑनलाईन

Next
ठळक मुद्दे१० रजिस्टरसाठी आता १ अप्लिकेशन सॉफ्टवेअर

लोकमत  न्यूज  नेटवर्क
नागपूर : एकात्मिक बाल विकास सेवा योजनेंतर्गत बालकांच्या सुदृढ आरोग्यासाठी राज्यात अंगणवाड्या कार्यरत आहेत. अंगणवाडीच्या माध्यमातून सरकारने ‘पोषण अभियान’ राबविले आहे. या पोषण अभियानाला गती देण्यासाठी शासनाने कॉमन अप्लिकेशन सॉफ्टवेअर (कॅस)ची निर्मिती केली आहे; सोबतच सर्व सेविकांना स्मार्ट फोन उपलब्ध करून दिला आहे. या अप्लिकेशनद्वारे अंगणवाडी केंद्रातील नियमित माहिती दैनंदिन पद्धतीने भरायची आहे. अंगणवाडी केंद्रात आतापर्यंत माहिती संकलनासाठी १० रजिस्टर भरावे लागत होते. आता हे काम एका अप्लिकेशनद्वारे होणार आहे.
केंद्र सरकारने एकात्मिक बाल विकास सेवा योजनेत ‘कॅस’ची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी अंगणवाडी केंद्रामध्ये ठेवण्यात येणारे स्टॉक रजिस्टरबरोबरच इतर १० रजिस्टर बंद करण्यात यावे, असे निर्देश दिले आहे. ‘कॅस’ संदर्भातील प्रशिक्षण अंगणवाडी सेविका, पर्यवेक्षिका व मुख्य सेविकांचे पूर्ण झाले आहे. शासनाच्या डॅश बोर्डवर अंगणवाडी सेविका सॉफ्टवेअरचा वापर करीत असल्याचे दिसून आले आहे. यासाठी अंगणवाडीसेविकांना स्मार्ट फोन डाटा प्लॅनसह दिला आहे.
पोषण अभियानांतर्गत पुढील तीन वर्षांत निश्चित उद्दिष्टे साध्य करावयाची आहेत. त्यात ० ते ६ वर्षे वयोगटातील बालकांतील खुजे/बुटकेपणाचे प्रमाण कमी करणे, बालकांमधील कुपोषणाचे प्रमाण कमी करणे, बालकांतील रक्तक्षय, जन्मत: कमी वजनाचे असणाऱ्या बालकांचे प्रमाण कमी करणे. तसेच किशोरवयीन मुली व महिलांमधील रक्तक्षयाचे प्रमाण कमी करणे. सोबतच बाळाच्या जन्मानंतरचे पहिले एक हजार दिवस यावर विशेष लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे. या अभियानांतर्गत पुढील तीन वर्षांत अंगणवाडी केंद्र इमारतीचे बळकटीकरण करणे, लसीकरण, आरोग्य-शिक्षण आदींचा समावेश आहे. या सर्व कामकाजाची माहिती, संचालनाची जबाबदारी अंगणवाडी सेविकांवर आहे. त्याचबरोबर अंगणवाडीतील दैनंदिन कामकाजासाठी वेगवेगळे १० रजिस्टर नियमित भरावे लागत असल्याने ‘कॅस’द्वारे हे काम सहजतेने होईल, अशी अपेक्षा आहे.
 अंगणवाडी सेविकांचे मानधनही ‘कॅस’द्वारे
अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचे मानधन ‘पीएफएमएस’ प्रणालीद्वारे अदा करण्यात येते. मानधन अदा करीत असताना ‘कॉमन अप्लिकेशन सॉफ्टवेअर’द्वारे अंगणवाडीत सेविकेच्या उपस्थितीचे दिवस, अंगणवाडी किती दिवस उघडण्यात आली, याची माहिती प्राप्त होईल. त्याद्वारे मानधन अदा करण्याची कारवाई करता येईल.

Web Title: CAS Helping for Anganwadi Sevica : Every Anganwadi Online

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.