काेराडी वीज केंद्राचे प्रकरण ग्रीन ट्रिब्युनलमध्ये पाेहोचले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2021 04:09 AM2021-09-18T04:09:44+5:302021-09-18T04:09:44+5:30
कृषी विज्ञान आराेग्य संस्थेचे ओमप्रकाश जाजाेदिया, किसान मंचचे प्रताप गाेस्वामी आणि प्रद्युम्न सहस्रभाेजने यांनी हरित लवादामध्ये याचिका दाखल करून ...
कृषी विज्ञान आराेग्य संस्थेचे ओमप्रकाश जाजाेदिया, किसान मंचचे प्रताप गाेस्वामी आणि प्रद्युम्न सहस्रभाेजने यांनी हरित लवादामध्ये याचिका दाखल करून काेराडी वीज केंद्राने त्यांच्या ६६० मेगावॅट क्षमतेच्या युनिटमध्ये अद्याप एफजीडी स्थापित न केल्याचा आराेप केला. यामुळे केंद्रातून अधिक प्रमाणात सल्फर डायऑक्साईडचे उत्सर्जन हाेत असल्याचे म्हटले आहे. यासह केंद्रातून निघणारी राख केवळ एक टक्का उपयाेगात आणली जात आहे. यामुळे प्रदूषण पसरत असून, राखेची साठवण करण्यातही यश न मिळाल्याचे नमूद करण्यात आले आहे. याचिकेनुसार वीज केंद्रात शुद्ध पाणी उपयाेगात आणण्यावर निर्बंध आहेत. असे असताना महाजनकाे भांडेवाडी प्लान्टमधून शुद्ध करण्यात आलेल्या नाग नदीच्या पाण्याचा उपयाेग करीत आहे. याशिवाय पर्यावरण परवानगीसाठी आवश्यक असलेले ग्रीन बेल्टही तयार करण्यात आले नसल्याचे याचिकेत नमूद करण्यात आले आहे.