नागपूर पूर्व आरटीओत रोखीचे व्यवहार बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 2, 2018 12:19 AM2018-11-02T00:19:59+5:302018-11-02T00:20:40+5:30
उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, नागपूर पूर्वचे कामकाज शिस्तबद्ध व सुनियोजित पद्धतीने आणि अधिक कार्यक्षमतेने चालू राहण्यासाठी ‘आॅनलाईन अपॉर्इंटमेंट’ योजना सुरू करण्यात आली. परिवहन संवर्गातील वाहनांच्या विविध सेवेशी संबंधित शुल्क आता आॅनलाईन अर्जासोबतच भरावयाचे आहे. कार्यालयाच्या या निर्णयाने वाहनधारकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, नागपूर पूर्वचे कामकाज शिस्तबद्ध व सुनियोजित पद्धतीने आणि अधिक कार्यक्षमतेने चालू राहण्यासाठी ‘आॅनलाईन अपॉर्इंटमेंट’ योजना सुरू करण्यात आली. परिवहन संवर्गातील वाहनांच्या विविध सेवेशी संबंधित शुल्क आता आॅनलाईन अर्जासोबतच भरावयाचे आहे. कार्यालयाच्या या निर्णयाने वाहनधारकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
आरटीओमध्ये वाहन परवाना काढण्यासाठी होत असलेली उमेदवारांची प्रचंड गर्दी, तासन्तास रांगेत उभे राहण्याचा होत असलेला त्रास, त्यामुळे वाया जात असलेला वेळ आणि श्रम, या सर्व व्यापातून मुक्त होण्यासाठी परिवहन विभागाने आॅनलाईन अपॉर्इंटमेंट योजना सुरू केली. आता या योजनेमधूनच आॅनलाईन पेमेंट करण्याची सोयही उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यानुसार परिवहन संवर्गातील तसेच योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरण, वाहनांच्या विविध सेवा, जसे कर्ज चढविणे, कर्ज उतरविणे, कर्ज संलग्नता, मालकी हक्क हस्तांतरण, पत्ता बदल व दुय्यम नोंदणी प्रमाणपत्र, ना-हरकत प्रमाणपत्र आदी स्वरूपाच्या कामांकरिता शुल्क व दंड आता केवळ ई-पेमेंटनेच स्वीकारले जाणार आहे. ‘वाहन ४.०’ या प्रणालीवर ही सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. वाहनधारकांच्या वेळेची बचत होऊन विनाविलंब सेवा देण्याकरिता या प्रणालीचा उपयोग करण्याचे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद जाधव यांनी केले आहे.