निवडणूक कर्मचाऱ्यांसाठी जवळच्या कोणत्याही हॉस्पिटलमध्ये कॅशलेस उपचार

By सुमेध वाघमार | Published: April 9, 2024 07:07 PM2024-04-09T19:07:54+5:302024-04-09T19:08:12+5:30

-जिल्हाधिकारी डॉ. इटनकर : मनपा व आरोग्य विभागाला सूचना

Cashless treatment for election workers at any nearby hospital | निवडणूक कर्मचाऱ्यांसाठी जवळच्या कोणत्याही हॉस्पिटलमध्ये कॅशलेस उपचार

निवडणूक कर्मचाऱ्यांसाठी जवळच्या कोणत्याही हॉस्पिटलमध्ये कॅशलेस उपचार

नागपूर: रामटेक व नागपूर लोकसभा मतदार संघासाठी १९ एप्रिल रोजी होऊ घातलेल्या मतदानाच्या दरम्यान निवडणूक प्रक्रियेतील कर्मचाºयांपैकी जर कुणाच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला तर जवळच्या कोणत्याही हॉस्पिटलमध्ये कॅशलेस उपचार सुविधा मिळणार आहे. त्या दृष्टीने समन्वय साधण्याचा सूचना जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी मनपा व आरोग्य विभागाला दिल्या.

निवडणुकीच्या पुर्वतयारी संदर्भात मंगळवारी बचत भवनमध्ये आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा, रामटेक लोकसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी तुषार ठोंबरे, जिल्ह्यातील सर्व विभाग प्रमुख, निवडणूक यंत्रणांमध्ये असलेले सर्व वरिष्ठ अधिकारी यांची उपस्थिती होती.

एप्रिल महिन्याचा दुसरा आठवड्यात पार घसरल्याने उन्हाचा त्रास कमी असलातरी पुढील दिवसांत तो वाढण्याची शक्यता आहे. उन्हाची स्थिती लक्षता घेऊन जिल्हाधिकारी डॉ. इटनकर यांनी आरोग्य यंत्रणेला सतर्कतेचे निर्देश दिले आहेत. निवडणूक कामानिमित्त कर्तव्यावर असलेले अधिकारी, कर्मचारी निवडणुकीच्या कामांना प्राधान्य देत असतात. एखादया कर्मचाºयाला दुर्दैवाने काही गंभीर आरोग्याची समस्या निर्माण झाली तर आरोग्य विभागाने तत्परतेने त्या रुग्णाच्या गरजेनुरुप योग्य उपचार देणे आवश्यक आहेत. त्याच्याजवळ लागलीच पैसे उपलब्ध होतील असे नाही. या दृष्टीने हे नियोजन आवश्यक असल्याचे ते म्हणाले.

-पिण्याचा पाण्याची व बसण्याची सोय
प्रत्येक मतदान केंद्रांवर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था असली पाहिजे. यात ग्रामीण भागात जी मतदान केंद्रे आहेत, त्या ठिकाणी ग्रामपंचायतींनी ती व्यवस्था केली पाहिजे. ज्या ठिकाणी खाजगी शाळा आहेत, संस्था आहेत अशा संस्थांनी या व्यवस्थेसाठी पुढाकार घेतला पाहिजे. विशेषत: मतदारांना मतदानासाठी रांगेत उभे राहण्यापेक्षा त्या मतदान केंद्राच्या परिसरात इतर काही वर्गखोल्या, हॉल असेल तर तिथे मतदारांना बसण्याची व्यवस्था करण्याचा सूचनाही जिल्हाधिकारी डॉ. इटनकर यांनी दिल्या. ज्या ठिकाणी मतदारांना बसण्याची सुविधा शक्य नाहीत अशा मतदान केंद्राच्या परिसरात मतदारांना पेंडालची सुविधा दिली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

Web Title: Cashless treatment for election workers at any nearby hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :nagpurनागपूर