जात प्रमाणपत्र पडताळणी प्रस्ताव महाविद्यालयाने सादर करावेत

By admin | Published: September 13, 2015 03:03 AM2015-09-13T03:03:43+5:302015-09-13T03:03:43+5:30

१२ वी विज्ञान शाखेत २०१५-१६ या शैक्षणिक वर्षात प्रवेशित असलेल्या विद्यार्थ्यांचे जात प्रमाणपत्र पडताळणीचे प्रस्ताव गेल्या १ आॅगस्टपासून महाविद्यालयामार्फत स्वीकारण्यात येत आहेत.

The caste certificate should be submitted by the college | जात प्रमाणपत्र पडताळणी प्रस्ताव महाविद्यालयाने सादर करावेत

जात प्रमाणपत्र पडताळणी प्रस्ताव महाविद्यालयाने सादर करावेत

Next


नागपूर : १२ वी विज्ञान शाखेत २०१५-१६ या शैक्षणिक वर्षात प्रवेशित असलेल्या विद्यार्थ्यांचे जात प्रमाणपत्र पडताळणीचे प्रस्ताव गेल्या १ आॅगस्टपासून महाविद्यालयामार्फत स्वीकारण्यात येत आहेत. हे प्रस्ताव ३१ आॅक्टोबरपर्यंत स्वीकारण्यात येतील.
संबंधित महाविद्यालय विद्यार्थ्यास बोनाफाईड देऊन प्रस्ताव स्वत: प्रत्यक्ष जात पडताळणी कार्यालयात उपस्थित राहून अर्ज सादर करण्याच्या सूचना देतात. त्यामुळे विद्यार्थ्यास आर्थिक भुर्दंड सहन करावा लागते. कार्यालयात विद्यार्थ्यांची गर्दीही वाढत आहे. तरी संबंधित महाविद्यालयाने या समिती कार्यक्षेत्रातील अर्ज १०० रुपये या वाढीव शुल्कासह स्वीकारून ते येत्या ३१ आॅक्टोबरपर्यंत कार्यालयास सादर करावेत, असे आवाहन विभागीय जात प्रमाणपत्र पडताळणी समिती क्रमांक १ चे उपायुक्त तथा सदस्य सुरेद्र पवार यांनी केले आहे. (प्रतिनिधी)

Web Title: The caste certificate should be submitted by the college

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.