जात वैधतेशिवाय प्रवेश नको
By admin | Published: July 11, 2016 02:43 AM2016-07-11T02:43:22+5:302016-07-11T02:43:22+5:30
‘एनआयटी’मध्ये (नॅशनल इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजी) सुरू असलेल्या प्रवेशप्रक्रियेमध्ये जात वैधता प्रमाणपत्राशिवाय प्रवेश देण्यात येऊ नये,
आदिवासी विद्यार्थ्यांची मागणी : ‘व्हीएनआयटी’त आंदोलन
नागपूर : ‘एनआयटी’मध्ये (नॅशनल इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजी) सुरू असलेल्या प्रवेशप्रक्रियेमध्ये जात वैधता प्रमाणपत्राशिवाय प्रवेश देण्यात येऊ नये, अशी मागणी मूलनिवासी आदिवासी हक्क संघर्ष संघटनेच्या वतीने करण्यात आली. यासंदर्भात संघटनेतर्फे ‘व्हीएनआयटी’त आंदोलनदेखील करण्यात आले.
प्रवेश घेताना अनुसूचित जाती-जमातीमधील विद्यार्थ्यांना जात प्रमाणपत्रासह जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. मात्र, ‘व्हीएनआयटी’मध्ये काही आदिवासी विद्यार्थ्यांनी जात वैधता प्रमाणपत्राशिवाय प्रवेश घेतला आहे. यामुळे मूळ आदिवासी विद्यार्थी हे प्रवेशापासून वंचित राहत आहेत, असा आरोप संघटनेकडून करण्यात आला.
प्र्रवेशापूर्वी सर्व आदिवासी विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र अनिवार्य करावे, विना प्रमाणपत्र प्रवेश रद्द करावे, अशी मागणी संघटनेच्या वतीने करण्यात आली.
संघटनेच्या वतीने ‘व्हीएनआयटी’चे संचालक डॉ. नरेंद्र चौधरी यांना निवेदनदेखील देण्यात आले. यावेळी संघटनेतर्फे राजे वासुदेवराव टेकाम, डॉ. दिलीप कुमरे, डॉ. नरेंद्र कोडवते, मधुकर उईके, सुधाकर आत्राम, देवेंद्र मसराम, कवडू आरके आदी उपस्थित होते.(प्रतिनिधी)