मांजरीला ‘शॉक’, वीज झाली ‘स्टॉप’ : महावितरण कर्मचाऱ्यांची धावाधाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2019 11:28 PM2019-05-13T23:28:51+5:302019-05-13T23:30:22+5:30

सोमवारी पहाटेच्या सुमारास रामदासपेठ ते अमरावती मार्गापर्यंतच्या परिसरात अचानक वीज पुरवठा खंडित झाला. लगेच फोनाफोनी सुरू झाली आणि नेमके कारण शोधण्याची सुरुवात झाली. महावितरण कर्मचाऱ्यांच्या डोळ्यासमोर जे चित्र आले ते त्यांनादेखील धक्का देणारे होते. महाराजबागेजवळील सीताबर्डी सबस्टेशनमधील ट्रान्सफॉर्मरजवळ एका मांजरीचा विजेच्या ‘शॉक’ने कोळसा झाला होता व त्यामुळे संपूर्ण भागाच्या वीजपुरवठ्याला फटका बसला होता. कर्मचाऱ्यांसह अधिकाऱ्यांनादेखील प्रत्यक्ष यावे लागले व अखेर अनेक तासांच्या प्रयत्नानंतर सुरळीत वीज पुरवठा सुरू झाला.

Cats 'Shock', Electricity Turns 'Stop': Mahavitaran Workers Run | मांजरीला ‘शॉक’, वीज झाली ‘स्टॉप’ : महावितरण कर्मचाऱ्यांची धावाधाव

मांजरीला ‘शॉक’, वीज झाली ‘स्टॉप’ : महावितरण कर्मचाऱ्यांची धावाधाव

googlenewsNext
ठळक मुद्देनागपुरातील रामदासपेठ ते अमरावती मार्गावर ‘बत्ती गुल’

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सोमवारी पहाटेच्या सुमारास रामदासपेठ ते अमरावती मार्गापर्यंतच्या परिसरात अचानक वीज पुरवठा खंडित झाला. लगेच फोनाफोनी सुरू झाली आणि नेमके कारण शोधण्याची सुरुवात झाली. महावितरण कर्मचाऱ्यांच्या डोळ्यासमोर जे चित्र आले ते त्यांनादेखील धक्का देणारे होते. महाराजबागेजवळील सीताबर्डी सबस्टेशनमधील ट्रान्सफॉर्मरजवळ एका मांजरीचा विजेच्या ‘शॉक’ने कोळसा झाला होता व त्यामुळे संपूर्ण भागाच्या वीजपुरवठ्याला फटका बसला होता. कर्मचाऱ्यांसह अधिकाऱ्यांनादेखील प्रत्यक्ष यावे लागले व अखेर अनेक तासांच्या प्रयत्नानंतर सुरळीत वीज पुरवठा सुरू झाला.
पहाटे ३.४५ च्या सुमारास महाराजबागजवळील सीताबर्डी सबस्टेशन येथे मोठा आवाज झाला व वीज पुरवठा खंडित झाला. महावितरणचे कर्मचारी तेथे पोहोचले व त्यांना तिथे जळालेली मांजरच दिसली. मानकापूर सबस्टेशन येथून आलेल्या ३३ केव्ही लाईनला ट्रान्सफॉर्मरला जोडणाऱ्या ‘बस’च्या संपर्कात ही मांजर आली होती. विजेचा धक्का इतका तीव्र होता की मांजर अनेक फूट दूर जाऊन पडली. या घटनेमुळे ‘फीडर’ ट्रीप झाले व रामदासपेठ, काचीपुरा चौक, अमरावती मार्गापर्यंतची वीज गेली. महावितरणने ही माहिती तत्काळ महापारेषणच्या मानकापूर स्थित सबस्टेशनला दिली. तेथून लाईन सुरू करताच १० एमव्हीए क्षमतेच्या ट्रान्सफॉर्मरचा ब्रेकर जाम झाला. लाईन परत बंद झाल्यामुळे अतिरिक्त कार्यकारी अभियंता उदय फरासखानावाला तेथे पोहोचले. फटका बसलेल्या भागांना इतर ट्रान्सफॉर्मर्ससोबत जोडण्याचा प्रयत्न झाला, मात्र ‘कपल ब्रेकर’मधून धूर निघू लागल्याने त्यात यश आले नाही. अखेर सकाळी ५.३० च्या सुमारास तांत्रिक अडथळे दूर करून वीजपुरवठा सुरळीत करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली.

Web Title: Cats 'Shock', Electricity Turns 'Stop': Mahavitaran Workers Run

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.