कत्तलीसाठी गोवंश बांधले, आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल
By दयानंद पाईकराव | Published: July 20, 2024 03:48 PM2024-07-20T15:48:34+5:302024-07-20T15:49:22+5:30
Nagpur : ९० हजार रुपये किमतीच्या गोवंशाची सुटका
नागपूर : कत्तलीसाठी सहा गोवंश बांधून ठेवणाऱ्या आरोपीविरुद्ध पाचपावली पोलिसांनी गुन्हा दाखल करून ९० हजार रुपये किमतीच्या गोवंशाची सुटका केली आहे. शेख जाबीर अली (रा. फारुखनगर) असे आरोपीचे नाव आहे.
पाचपावली पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार शुक्रवारी १९ जुलेला सकाळी ५ ते ९.३० दरम्यान त्यांनी आरोपी फारुखच्या घरी धाड टाकली असता तेथे ९० हजार रुपये किमतीचे ६ गोवंश कत्तलीसाठी बांधून ठेवल्याचे आढळले. या गोवंशाची सुटका करून ते धंतोली येथील गोरक्षण समितीत पाठविण्यात आले. पोलिसांनी आरोपी जाबीरविरुद्ध कलम ५ (अ), ५ (ब), ९ महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायदा १९९५, सहकलम ११, प्राणी क्रुरता अधिनियम १९६० नुसार गुन्हा दाखल करून आरोपीचा शोध सुरु केला आहे.