गुरांच्या वाहतुकीचे वाहन पकडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2021 04:08 AM2021-04-25T04:08:50+5:302021-04-25T04:08:50+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क केळवद : पाेलिसांनी नागपूर-सावनेर-पांढुर्णा मार्गावर केलेल्या कारवाईमध्ये गुरांची अवैध वाहतूक करणारे छाेटे मालवाहू वाहन पकडले. यात ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
केळवद : पाेलिसांनी नागपूर-सावनेर-पांढुर्णा मार्गावर केलेल्या कारवाईमध्ये गुरांची अवैध वाहतूक करणारे छाेटे मालवाहू वाहन पकडले. यात दाेघांना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून एकूण ६ लाख ५० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई शुक्रवारी (दि. २३) सकाळी करण्यात आली.
माेहम्मद सद्दाम माेहम्मद अब्दुल्ला (२४, रा. भानखेडा, डाेबीनगर, माेमीनपुरा, नागपूर) व माेहम्मद कमळे आलम अंजार शेख (२०, रा. पिली नदी, वनदेवी चाैक, परवेशनगर, नागपूर) अशी अटक करण्यात आलेल्या आराेपींची नावे आहेत. केळवद (ता. सावनेर) पाेलिसांचे पथक गस्तीवर असताना त्यांना पांढुर्णा येथून नागपूरच्या दिशेने गुरांची वाहतूक केली जात असल्याची माहिती मिळाली हाेती. त्यामुळे त्यांनी या मार्गावरील खुर्सापार शिवारातील आरटीओ चेक पाेस्टजवळ वाहनांची तपासणी करायला सुरुवात केली. पाेलिसांनी सीजी-०७/बीबी-१३०७ क्रमांकाचे वाहन थांबवून झडती घेतली. त्या वाहनात त्यांना १० जनावरे काेंबली असल्याचे आढळून आले.
कागदपत्रांच्या तपासणीअंती ती गुरांची अवैध वाहतूक असल्याचे तसेच ती जनावरे नागपूर शहरातील कत्तलखान्यात नेली जात असल्याचे चाैकशीत स्पष्ट झाले. त्यामुळे पाेलिसांनी वाहनातील दाेघांना अटक केली आणि त्यांच्याकडून वाहन व जनावरे जप्त केली. त्या जनावरांना नजीकच्या गाेरक्षणमध्ये पाठविण्यात आल्याची माहिती ठाणेदार दिलीप ठाकूर यांनी दिली. या कारवाईत पाच लाख रुपयांचे वाहन आणि १ लाख ५० हजार रुपये किमतीची १० जनावरे असा एकूण ६ लाख ५० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केल्याचे त्यांनी सांगितले. याप्रकरणी केळवद पाेलिसांनी गुन्हा नाेंदवून तपास सुरू केला आहे. ही कारवाई ठाणेदार दिलीप ठाकूर, रवींद्र डाेरले, रवींद्र चटप, गुणवंता डाखाेळे, सचिन येळकर, धाेंडूतात्या देवकते, नानूसाव राऊत, महेंद्र भाेयर, डॅनियल तांडेकर यांच्या पथकाने केली.