अवैध काेळसा वाहतुकीचा ट्रक पकडला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2021 04:09 AM2021-05-20T04:09:13+5:302021-05-20T04:09:13+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क कन्हान : काेळशाची अवैध वाहतूक करणारा ट्रक कन्हान पाेलिसांनी पकडला. यात ट्रकचालकासह दाेघांना अटक केली असून, ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
कन्हान : काेळशाची अवैध वाहतूक करणारा ट्रक कन्हान पाेलिसांनी पकडला. यात ट्रकचालकासह दाेघांना अटक केली असून, त्यांच्याकडून नऊ लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई गाेंडेगाव परिसरात साेमवारी (दि. १७) दुपारी २ वाजेच्या सुमारास करण्यात आली.
ट्रकचालक मुकेशकुमार मेवाड (३७, रा. शाजापूर, मध्य प्रदेश) व उमेश पानतावणे (४६, रा. कांद्री, कन्हान) अशी अटकेतील आराेपींची नावे आहेत. उपविभागीय पाेलीस अधिकारी मुख्तार बागवान हे पाेलीस पथकासह गस्तीवर असताना, गाेंडेगाव घाटराेहणा येथून एमपी-०९/एचएच-६५२१ क्रमांकाच्या ट्रकमध्ये गाेंडेगाव खाणीतील काेळसा चाेरून नेत असल्याची गुप्त सूचना पाेलिसांना मिळाली. दरम्यान, पाेलीस पथक घटनास्थळी पाेहाेचले असता, काेळसा भरणारे मजूर पळून गेले. पाेलिसांनी ट्रकचालकास ताब्यात घेत चाैकशी केली असता, उमेश पानतावणे यांच्या सांगण्यावरून काेळसा नेत असल्याची त्यांनी कबुली दिली. ट्रकचालकाकडेे काेळशाची राॅयल्टी वा गेटपास आढळून न आल्याने ही काेळशाची चाेरटी वाहतूक असल्याचे स्पष्ट झाले. पाेलिसांनी दाेन्ही आराेपींना अटक करीत त्यांच्याकडून आठ लाखांचा ट्रक व १ लाख रुपये किमतीचा २० टन काेळसा असा एकूण नऊ लाखांचा मुद्देमाल जप्त केला.
याप्रकरणी कन्हान पाेलिसांनी भादंवि कलम ३७९ अन्वये गुन्हा नाेंदविला असून, तपास सुरू केला आहे. ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी मुख्तार बागवान यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक अरुण त्रिपाठी, पाेलीस निरीक्षक (गुन्हे) यशवंत कदम, येसू जाेसेफ, कुणाल पारधी, राजेंद्र गाैतम, राहुल रंगारी, संदीप गेडाम, संजय बदोरिया, सुधीर चव्हाण, मुकेश वाघाडे, सुशील तट्टे यांच्या पथकाने केली.