रेती वाहतुकीचे टिप्पर पकडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2021 04:08 AM2021-04-28T04:08:57+5:302021-04-28T04:08:57+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क भिवापूर : स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने भिवापूर शहरात केलेल्या कारवाईमध्ये रेतीची विना राॅयल्टी आणि ओव्हरलाेड वाहतूक ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
भिवापूर : स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने भिवापूर शहरात केलेल्या कारवाईमध्ये रेतीची विना राॅयल्टी आणि ओव्हरलाेड वाहतूक करणारे तीन टिप्पर पकडले. यात तिन्ही टिप्परच्या चालकांना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून एकूण १ काेटी ५ लाख ९५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई मंगळवारी (दि. २७) सकाळी करण्यात आली.
दिनेश विलास बिलवणे (२४, रा. भंडारा), गौतम तुकाराम राजक (४०, रा. मध्य प्रदेश) व दुष्यंत संपतलाल सलामे (३२, रा. पाचगाव) अशी अटक करण्यात आलेल्या आराेपी टिप्परचालकांची नावे आहेत. रेतीच्या विना राॅयल्टी व ओव्हरलाेड वाहतुकीला आळा घालण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे विशेष माेहीम सुरू केली आहे. दरम्यान, स्थानिक गुन्हे शाखेचे पथक भिवापूर परिसरात गस्तीवर असताना त्यांना शहरातून एमएच-४०/सीडी-६४७५, एमएच-४०/बीएल-३८९५ व एक विना क्रमांकाचा असे तीन टिप्पर येताना दिसले.
पथकाने तिन्ही टिप्पर थांबवून झडती घेतली असता, त्या रेती आढळून आली. ती रेतीची विना राॅयल्टी व ओव्हरलाेड वाहतूक असल्याचे चाैकशीत स्पष्ट हाेताच पाेलिसांनी तिन्ही टिप्परच्या चालकांना ताब्यात घेत अटक केली. त्यांच्याकडून एक काेटी ५ लाख रुपये किमतीचे तीन टिप्पर आणि ९५ हजार रुपयांचर १९ ग्रास रेती असा एकूण १ काेटी ५ लाख ९५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला, अशी माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पाेलीस निरीक्षक अनिल जिट्टावार यांनी दिली. याप्रकरणी भिवापूर पाेलिसांनी आराेपींविरुद्ध भादंवि ३७९, १०९ अन्वये गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे रमेश भोयर, संतोष पंधरे, मदन आसतकर, राधेश्याम कांबळे, बालाजी साखरे, भाऊराव खंडाते यांच्या पथकाने केली.