रेती वाहतुकीचा टिप्पर पकडला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2021 04:11 AM2021-08-15T04:11:54+5:302021-08-15T04:11:54+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क कुही : पाेलिसांच्या पथकाने साळवा (ता. कुही) येथे गुरुवारी (दि. १२) मध्यरात्री केलेल्या कारवाईमध्ये रेतीची विना ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
कुही : पाेलिसांच्या पथकाने साळवा (ता. कुही) येथे गुरुवारी (दि. १२) मध्यरात्री केलेल्या कारवाईमध्ये रेतीची विना राॅयल्टी वाहतूक करणारा टिप्पर पकडला. त्यात चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्याच्याकडून एकूण ८ लाख १५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
कुही पाेलिसांचे पथक गस्तीवर असताना त्यांना साळवा परिसरातून रेतीची वाहतूक केली जात असल्याची माहिती मिळाली हाेती. त्यामुळे त्यांनी या मार्गावर पाहणी केली. त्यांनी साळवा येथील बसस्टाॅपजवळ एमएच-४०/एके-५७११ क्रमांकाचा टिप्पर थांबवून झडती घेतली. त्या टिप्परमध्ये रेती असल्याचे निदर्शनास येताच, कागदपत्रांची तपासणी केली. त्यात ती रेतीची विना राॅयल्टी वाहतूक असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे पाेलिसांनी टिप्परचालक रवी कृष्णा ठमरे (२५, रा. पचखेडी, ता. कुही) याच्याविराेधात गुन्हा नाेंदविला.
या कारवाईमध्ये आठ लाख रुपयाचा टिप्पर व १५ हजार रुपयाची पाच ब्रास रेती असा एकूण ८ लाख १५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला, अशी माहिती ठाणेदार चंद्रकांत मदने यांनी दिली. याप्रकरणी कुही पाेलिसांनी पाेलीस हवालदार अरुण कावळे यांच्या तक्रारीवरून भादंवि ३७९ अन्वये गुन्हा दाखल केला असून, या घटनेचा तपास पाेलीस उपनिरीक्षक देरकर करीत आहेत.