रेती वाहतुकीचा ट्रॅक्टर पकडला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2021 04:09 AM2021-02-27T04:09:38+5:302021-02-27T04:09:38+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क पारशिवनी : पाेलिसांनी महादुला शिवारातील कन्हान नदी परिसरात केलेल्या कारवाईमध्ये विना राॅयल्टी रेतीची वाहतूक करणारा ट्रॅक्टर ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
पारशिवनी : पाेलिसांनी महादुला शिवारातील कन्हान नदी परिसरात केलेल्या कारवाईमध्ये विना राॅयल्टी रेतीची वाहतूक करणारा ट्रॅक्टर पकडला. यात ट्रॅक्टर चालकास अटक करण्यात आली असून, त्याच्याकडून एकूण ७ लाख ५४ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई गुरुवारी (दि. २५) मध्यरात्री १.४५ वाजताच्या सुमारास करण्यात आली.
पारशिवनी पाेलिसांचे पथक गस्तीवर असताना त्यांना महादुला शिवारातून रेतीची वाहतूक केली जात असल्याची माहिती मिळाली हाेती. त्यामुळे यांनी या शिवारातील कन्हान नदी परिसराची पाहणी केली. यात त्यांना कन्हान नदीकडून विना क्रमांकाचा ट्रॅक्टर येताना दिसला. त्यांनी ताे ट्रॅक्टर थांबवून झडती घेतली असता, ट्राॅलीत रेती आढळून आली. कागदपत्राच्या तपासणीअंती ती रेती विना राॅयल्टी वाहतूक असल्साचे स्पष्ट झाले.
त्यामुळे पाेलिसांनी ट्रॅक्टरचालक राजकुमार सूरजसिंग खुरावत (३८, रा. पारशिवनी) यास अटक केली. त्याच्याकडून ७ लाख ५० हजार रुपये किमतीचा ट्रॅक्टर व चार हजार रुपये कितीची एक ब्रास रेती असा एकूण ७ लाख ५४ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती पाेलीस नाईक मुदसरजमाल यांनी दिली. याप्रकरणी पारशिवनी पाेलिसांनी भादंवि ३७९ अन्वये गुन्हा दाखल केला असून, या घटनेचा तपास पाेलीस नाईक संदीप कडू करीत आहेत.