रेती वाहतुकीचा ट्रक पकडला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2020 04:13 AM2020-11-28T04:13:07+5:302020-11-28T04:13:07+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क खापरखेडा : पाेलिसांनी बिना संगम (ता. कामठी) शिवारात केलेल्या कारवाईमध्ये रेतीची विना राॅयल्टी वाहतूक करणारा ट्रक ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
खापरखेडा : पाेलिसांनी बिना संगम (ता. कामठी) शिवारात केलेल्या कारवाईमध्ये रेतीची विना राॅयल्टी वाहतूक करणारा ट्रक पकडला. यात ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा नाेंदविण्यात आला असून, त्याच्याकडून एकूण ८ लाख १६ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई गुरुवारी (दि. २६) रात्री ९ वाजताच्या सुमारास करण्यात आली.
खापरखेडा (ता. सावनेर) पाेलिसांचे पथक गस्तीवर असताना त्यांना बिना संगम शिवारातून रेतीची वाहतूक केली जात असल्याची माहिती मिळाली हाेती. त्यामुळे त्यांनी या शिवाराची पाहणी केली असता, त्यांना कन्हान नदीच्या पात्रातून एमएच-३१/सीक्यू-३२५१ क्रमांकाचा ट्रक येताना दिसला. संशय आल्याने त्यांनी हा ट्रक थांबवून झडती घेतली. त्यात रेती असल्याचे निदर्शनास येताच कागदपत्रांची तपासणी केली. त्यात ट्रकमधील रेती ही विना राॅयल्टी असल्याचे स्पष्ट हाेताच पाेलिसांनी ट्रकचालक नरुउद्दीन शेख याच्याविरुद्ध गुन्हा नाेंदविला. शिवाय, त्याच्याकडून आठ लाख रुपयांचा ट्रक आणि १६ हजार रुपयांची चार ब्रास रेती असा एकूण८ लाख १६ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी खापरखेडा पाेलिसांनी भादंवि ३७६ अन्वये गुन्हा दाखल केला असून, या घटनेचा पुढील तपास पाेलीस नाईक दीपक रेवतकर करीत आहेत.