रेती वाहतुकीचे वाहन पकडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2020 04:26 AM2020-12-13T04:26:23+5:302020-12-13T04:26:23+5:30
खापरखेडा : पाेलिसांनी वारेगाव (ता. कामठी) शिवारात केलेल्या कारवाईमध्ये रेतीची विना राॅयल्टी वाहतूक करणारे छाेटे मालवाहू वाहन पकडले. यात ...
खापरखेडा : पाेलिसांनी वारेगाव (ता. कामठी) शिवारात केलेल्या कारवाईमध्ये रेतीची विना राॅयल्टी वाहतूक करणारे छाेटे मालवाहू वाहन पकडले. यात वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्याच्याकडून ३ लाख ५२ हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई शुक्रवारी (दि. ११) दुपारी १.३० वाजताच्या सुमारास करण्यात आली.
वारेगाव शिवारातून रेतीची वाहतूक केली जात असल्याची माहिती मिळताच पाेलिसांनी या भागाची पाहणी केली. तिथे पाेलिसांना एमएच-४९/एटी-५७३८ क्रमांकाचे छाेटे मालवाहू वाहन जाताना दिसले. त्यांनी हे वाहन थांबवून झडती घेतली. त्यात त्यांना रेती असल्याचे निदर्शनास आले. ती रेती काेलार नदीतील असून, विना राॅयल्टी असल्याचे चाैकशीत स्पष्ट हाेताच पाेलिसांनी वाहनासह रेती ताब्यात घेतली. या कारवाईमध्ये ३ लाख ५० हजार रुपयाचे वाहन आणि दाेन हजार रुपयाची एक ब्रास रेती असा एकूण ३ लाख ५२ हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती पाेलिसांनी दिली. याप्रकरणी खापरखेडा पाेलिसांनी वाहन चालकाविरुद्ध भादंंवि ३७९ अन्वये गुन्हा दाखल केला असून, या घटनेचा तपास पाेलीस हवालदार मिश्रा करीत आहेत.