रेती वाहतुकीचे सात टिप्पर पकडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2021 04:08 AM2021-05-26T04:08:04+5:302021-05-26T04:08:04+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क कामठी : पाेलीस उपायुक्त नीलाेत्पल यांच्या विशेष पथकाने केलेल्या कारवाईमध्ये रेतीची विना राॅयल्टी व ओव्हरलाेड वाहतूक ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
कामठी : पाेलीस उपायुक्त नीलाेत्पल यांच्या विशेष पथकाने केलेल्या कारवाईमध्ये रेतीची विना राॅयल्टी व ओव्हरलाेड वाहतूक करणारे सात टिप्पर पकडले. यात १० जणांना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून १ काेटी २८ लाख ४२ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई कामठी पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील नेरी शिवारात मंगळवारी (दि. २५) पहाटे करण्यात आली.
अटक करण्यात आलेल्या आराेपींमध्ये पवन किशोर ठाकूर (२३), मंगेश चुनीलाल पारधी (१८, दाेघेही रा. बिना संगम, ता. कामठी), विक्की मोरसिंग बढेल (२३, रा. पिपरी, ता. पारशिवनी), साहिल चंद्रभान चौधरी (२६, रा. कन्हान, ता. पारशिवनी), अब्दुल कादिर खान (३५), समीम गुलाम नबी अन्सारी (४१), अंकित रामू धरोडे (४०), शकील सागिर अहमद (४०) व अजय सुरेश चौधरी (१९, सर्व रा. वाठोडा, नागपूर) यांचा समावेश आहे.
पाेलीस उपायुक्त नीलाेत्पल यांचे विशेष पथक कामठी परिसरात गस्तीवर हाेते. त्यांना कन्हान नदीच्या नेरी घाट परिसरातून रेतीची वाहतूक केली जात असल्याची माहिती मिळताच त्यांनी पाहणी केली. त्यांना या शिवारात एमएच-३४/बीजी-३००७, एमएच-४०/५२५०, एमएच-४०/बीएल-६०३५, एमएच-४९/एटी-७२३५, एमएच-४०/सीडी-७१३१, एमएच-४०/बीएल-६६७४, एमएच-४०/एन-६६९४ क्रमांकाचे टिप्पर थांबवून झडती घेतली. त्या टिप्परमध्ये रेती आढळून येताच कागदपत्रांची तपासणी केली. ती रेतीची विना राॅयल्टी व ओव्हरलाेड वाहतूक असल्याचे चाैकशीत स्पष्ट हाेताच पाेलिसांनी सर्व ट्रक ताब्यात घेत टिप्परचालक व क्लिनरला अटक केली.
या कारवाईमध्ये एकूण १ काेटी २८ लाख रुपये किमतीचे ट्रक आणि ४२ हजार रुपयांची रेती असा एकूण १ काेटी २८ लाख ४२ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला अशी माहिती पाेलीस अधिकाऱ्यांनी दिली. ती रेती कन्हान नदीच्या पात्रातील असून, त्या रेतीची उचल नेरी घाटातून केली असल्याचेही त्यांनी सांगितले. याप्रकरणी कामठी पाेलिसांनी गुन्हा नाेंदवून तपास सुरू केला आहे. ही कारवाई सहायक पोलीस निरीक्षक संजय भिसे, सूरज भारती, दिनेश यादव, चेतन जाधव, हरीश इंगळे, रवींद्र राऊत यांच्या पथकाने केली.