जनावरांची तस्करी पकडली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2021 04:09 AM2021-05-11T04:09:10+5:302021-05-11T04:09:10+5:30
भिवापूर : कत्तलीसाठी जनावरांची अवैध वाहतूक करणाऱ्या वाहनासह तीन आरोपींना पोलिसांनी सोमवारी अटक केली. यात ९० हजार रुपये किमतीच्या ...
भिवापूर : कत्तलीसाठी जनावरांची अवैध वाहतूक करणाऱ्या वाहनासह तीन आरोपींना पोलिसांनी सोमवारी अटक केली. यात ९० हजार रुपये किमतीच्या सहा जनावरांसह वाहन असा एकूण ५ लाख ९० हजार रुपये किमतीचा माल जप्त करण्यात आला. जितेंद्र जयराम पाकमोडे (४१), राहुल शामराव बाळबुधे (२७), शारुख सय्यद बरकत अली सय्यद (२४) सर्व रा. गेवर्धा, ता. कुरखेडा अशी आरोपींची नावे आहेत. प्राप्त माहितीनुसार स्थानिक राष्ट्रीय मार्गावरील नाकाबंदी चौकीवर तैनात असलेले पोलीस कर्मचारी प्रत्येक वाहनांची तपासणी करत आहेत. याच दरम्यान गडचिरोलीहून नागपूरच्या दिशेने भरधाव वेगात येत असलेल्या महेंद्रा पिकअप क्र. एमएच ४९ एटी ५०१७ हे वाहन थांबवून पोलिसांनी तपासणी केली असता त्यात ६ रेडे कोंबून भरले असल्याचे आढळले. त्यामुळे अवैध वाहतूक प्रकरणी जनावरे व वाहन असा एकूण ५ लाख ९० हजार रुपये किमतीचा माल जप्त करत पोलिसांनी आरोपी विरूध्द गुन्हा नोंदवित त्यांना अटक केली. ठाणेदार महेश भोरटेकर यांच्या मार्गदर्शनात पुढील तपास नरेंद्र पटले करीत आहेत.
---
पोलिसांनी जनावरांसह जप्त केलेले वाहन.