गुरांच्या अवैध वाहतुकीचा ट्रक पकडला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2021 04:11 AM2021-08-29T04:11:55+5:302021-08-29T04:11:55+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क माैदा : पाेलिसांच्या पथकाने शुक्रवारी (दि. २७) सायंकाळी ६.४५ वाजेच्या सुमारास अंबाडी-सेलू मार्गावर केलेल्या कारवाईमध्ये गुरांची ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
माैदा : पाेलिसांच्या पथकाने शुक्रवारी (दि. २७) सायंकाळी ६.४५ वाजेच्या सुमारास अंबाडी-सेलू मार्गावर केलेल्या कारवाईमध्ये गुरांची अवैध वाहतूक करणारा ट्रक पकडला. यात ट्रकचालकास अटक करण्यात आली असून, त्याच्याकडून १९ लाख ७४ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. शिवाय ट्रकमधील २१ गुरांची सुटका करण्यात आली, अशी माहिती ठाणेदार हेमंतकुमार खराबे यांनी दिली.
माैदा पाेलिसांचे पथक गस्तीवर असताना त्यांना अंबाडी-सेलू मार्गावरून गुरांची वाहतूक केली जात असल्याची माहिती मिळाली हाेती. त्यामुळे या पथकाने प्रत्यक्ष पाहणी केली. त्यांना ट्रक (क्र. एमएच ४० बीएल ८४९२) जाताना दिसला. त्यांनी हा ट्रक थांबविला व झडती घेतली. यात २७ जनावरे काेंबली असल्याचे आढळून आले.
ती गुरांची अवैध वाहतूक असल्याचे चाैकशीत स्पष्ट झाले. ती जनावरे कामठी शहरातील कत्तलखान्यात नेली जात असल्याचेही चाैकशीत उघड झाले. त्यामुळे पाेलिसांनी ट्रकचालक कमाल अहमद माेहम्मद जलील (४१, रा. वारीसपुरा, कामठी) यास अटक केली. त्याच्याकडून एकूण १९ लाख ७४ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला, अशी माहिती ठाणेदार हेमंतकुमार खराबे यांनी दिली.
ट्रकमधील जनावरांना नजीकच्या गाेशाळेत पाठविण्याची व्यवस्था केल्याचेही त्यांनी सांगितले. याप्रकरणी माैदा पाेलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. ही कारवाई पाेलीस हवालदार मनाेहर जंगवाड, मनिराम भुरे, शिवाजी नागरे, जितेंद्र बाेरकर यांच्या पथकाने केली.