सावधान...नागपूर जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी दहाहून अधिक कोरोनाबाधित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2021 22:42 IST2021-10-20T22:40:48+5:302021-10-20T22:42:37+5:30

Nagpur News कोरोनाचा संसर्ग कमी झाल्यानंतर लोकांकडून बेजबाबदारपणा दाखविण्यात येत असून, परत एकदा बाधितांची संख्या वाढण्यास सुरुवात झाली आहे.

Caution ... For the second day in a row in Nagpur district more than ten corona affected | सावधान...नागपूर जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी दहाहून अधिक कोरोनाबाधित

सावधान...नागपूर जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी दहाहून अधिक कोरोनाबाधित

ठळक मुद्देसक्रिय रुग्णसंख्या ३७ वर१३ रुग्णांची नोंद

नागपूर : कोरोनाचा संसर्ग कमी झाल्यानंतर लोकांकडून बेजबाबदारपणा दाखविण्यात येत असून, परत एकदा बाधितांची संख्या वाढण्यास सुरुवात झाली आहे. बुधवारी जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी दहाहून अधिक नवे बाधित नोंदविले गेले. दिवसभरात १३ रुग्णांची नोंद झाली व त्यातील १२ जण शहरातील होते. सक्रिय रुग्णसंख्या ३७ वर गेली असून, ही इशाऱ्याची घंटा मानण्यात येत आहे. (For the second day in a row in Nagpur district more than ten corona affected)

 

बुधवारी कोरोनाच्या चाचण्या कमी असल्या, तरी त्या तुलनेत बाधित अधिक होते. २४ तासांत जिल्ह्यात केवळ २ हजार १८७ चाचण्याच झाल्या. त्यातील १ हजार ९४८ शहरातील, तर २३९ ग्रामीण भागातील होत्या. शहरात १२ व ग्रामीणमध्ये एक बाधित आढळला.

जिल्ह्यातील एकूण रुग्णांची संख्या ४ लाख ९३ हजार ४०३ वर पोहोचली असून, मृतांची संख्या १० हजार १२० इतकी आहे. शहरात आतापर्यंत ३, ४०, ३३९, तर ग्रामीणमध्ये १,४६,१८८ रुग्ण नोंदविले गेले आहेत. सध्यस्थितीत शहरात २६ व ग्रामीण भागात चार सक्रिय रुग्ण आहेत.

कोरोनाची बुधवारची स्थिती

दैनिक चाचण्या: ३,१८७

शहर : १२ रुग्ण व ० मृत्यू

ग्रामीण : १ रुग्ण व ० मृत्यू

एकूण बाधित रुग्ण :४,९३,४०३

एकूण सक्रिय रुग्ण :३७

एकूण बरे झालेले रुग्ण : ४,८३,२४६

एकूण मृत्यू : १०,१२०

Web Title: Caution ... For the second day in a row in Nagpur district more than ten corona affected

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.