रामटेक शहरात काेविड केअर सेंटर सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2021 04:08 AM2021-04-14T04:08:34+5:302021-04-14T04:08:34+5:30

लाेकमत न्यूज नेटवर्क रामटेक : शहरासह तालुक्यात काेराेनाच्या रुग्णांमध्ये वाढ हाेत असतानाच शहरात स्वामी सीताराम महाराज हाॅस्पिटल व किमया ...

Cavid Care Center started in Ramtek city | रामटेक शहरात काेविड केअर सेंटर सुरू

रामटेक शहरात काेविड केअर सेंटर सुरू

Next

लाेकमत न्यूज नेटवर्क

रामटेक : शहरासह तालुक्यात काेराेनाच्या रुग्णांमध्ये वाढ हाेत असतानाच शहरात स्वामी सीताराम महाराज हाॅस्पिटल व किमया हाॅस्पिटलमध्ये काेविड केअर सेंटर सुरू करण्यात आले असून, तिथे प्रत्येकी २५ प्रमाणे ५० खाटांची साेय करण्यात आली आहे. याशिवाय शहरातील उपजिल्हा रुग्णालयात २० खाटांची सुविधा करण्यात आली असून, ऑक्सिजन पुरवठ्यासह दहा खाटांची अतिरिक्त व्यवस्था करण्यात आली आहे, अशी माहिती उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डाॅ. प्रकाश उजगरे यांनी दिली.

रामटेक शहरासह तालुक्यातील विविध गावांमधील काेराेना रुग्णांमध्ये दिवसेंदिवस भर पडत असल्याने तसेच नागपूर शहरातील सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये खाटांची कमतरता जाणवायला लागल्याने रामटेक शहरात काेविड केअर सेंटरची निर्मिती करणे गरजेचे हाेते. त्याआनुषंगाने तालुका व आराेग्य प्रशासनाने शहरातील स्वामी सीताराम महाराज हाॅस्पिटल व किमया हाॅस्पिटलच्या व्यवस्थापनाशी चर्चा केली आणि त्यांनी सहमती दर्शविताच प्रस्ताव जिल्हा प्रशासनाकडे पाठविला. या प्रस्तावाला जिल्हा प्रशासनाने नुकतीच मंजुरी दिल्याने या काेविड केअर सेंटरच्या निर्मितीचा मार्ग माेकळा झाला.

हे दाेन्ही काेविड केअर सेंटर साेमवार (दि. १२)पासून सुरू करण्यात आले आहेत. त्याप्रमाणे नगर परिषदेच्या सुतिकागृहातही काेविड केअर सेंटर सुरू करण्यात आले असून, तिथे ५० खाटांची व्यवस्था करण्यात आली आहे. हेही सेंटर साेमवारपासून रुग्णांच्या सेवेत रुजू झाले आहे. स्वामी सीताराम महाराज हॉस्पिटलमध्ये २५ व किमया हॉस्पिटलमध्ये २० खाटांचे डेडिकेटेड कोविड सेंटर सुद्धा कार्यान्वियत करण्यात आले. उपचाराच्या या सुविधेमुळे शहरी व ग्रामीण तसेच गरीब नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

...

ऑक्सिजन पुरवठा बेडमध्येही भर

पूर्वी रामटेक शहरातील उपजिल्हा रुग्णालयात काेराेना संक्रमित रुग्णांसाठी ऑक्सिजन पुरवठ्याच्या दहा बेड्सची व्यवस्था करण्यात आली हाेती. ही सुविधा अपुरी पडायला लागल्याने येथे ऑक्सिजन पुरवठ्याचे दहा बेड पुन्हा वाढविण्यात येणार असल्याचा निर्णय घेण्यात आल्याने या बेडची संख्या आता २० हाेणार आहे. दरम्यान, आमदार आशिष जयस्वाल, तहसीलदार बाळासाहेब मस्के व उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डाॅ. प्रकाश उजगरे यांनी शहरातील सर्व काेविड केअर सेंटरची पाहणी करून सुविधांचा आढावा घेतला.

Web Title: Cavid Care Center started in Ramtek city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.