उमरेडच्या मुख्य चौकात काेविड चाचणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2021 04:09 AM2021-05-18T04:09:36+5:302021-05-18T04:09:36+5:30

उमरेड : कोरोना काळात संचारबंदी लागू आहे. अशातही काही रिकामटेकडे नियमांची पायमल्ली करतात. अशा नागरिकांची थेट श्री संत ...

Cavid test at Umred's main square | उमरेडच्या मुख्य चौकात काेविड चाचणी

उमरेडच्या मुख्य चौकात काेविड चाचणी

Next

उमरेड : कोरोना काळात संचारबंदी लागू आहे. अशातही काही रिकामटेकडे नियमांची पायमल्ली करतात. अशा नागरिकांची थेट श्री संत जगनाडे महाराज भिसी नाका चौक येथे काेविड चाचणी करण्यात आली. यावेळी आ. राजू पारवे यांची उपस्थिती होती. विनाकरण फिरू नका, गर्दी करू नका, नियमावली तोडू नका, असे आवाहनसुद्धा त्यांनी नागरिकांना केले.

उमरेड परिसरातील झोपडपट्टी परिसरात प्रत्यक्ष भेट देत लसीकरण करण्याचे आवाहन आ. राजू पारवे यांनी केले. ४५ वर्षांपेक्षा अधिक नागरिकांनी लसीकरण करावे, असेही ते बोलले. यावेळी अनेक तरुणांनी १८ वर्षांवरील लसीकरण करण्याची मागणी केली. यावरही मी गंभीर असून, लवकरच आपल्या क्षेत्रात १८ वर्षांवरील लसीकरण होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी तहसीलदार प्रमोद कदम, उपविभागीय पोलीस अधिकारी भीमराव टेळे, ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. एस. एम. खानम, नायब तहसीलदार प्रदीप वरपे, नगरसेवक महेश भुयारकर, विशाल देशमुख, सुरेश वाघमारे, गुणवंता मांढरे, रितेश राऊत, मनीष शिंगणे, भूमिका लोणारे, गोलू जैसवानी, महेश महल्ले आदींसह कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

Web Title: Cavid test at Umred's main square

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.