विनाकारण फिरणाऱ्यांची काेविड चाचणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2021 04:09 AM2021-05-20T04:09:04+5:302021-05-20T04:09:04+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क जलालखेडा : पाेलिसांनी विनाकारण फिरणाऱ्यांविराेधात कारवाई सुरू केली आहे. गावातील रस्त्यांवर विनाकारण फिरणाऱ्या २२ जणांची बुधवारी ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
जलालखेडा : पाेलिसांनी विनाकारण फिरणाऱ्यांविराेधात कारवाई सुरू केली आहे. गावातील रस्त्यांवर विनाकारण फिरणाऱ्या २२ जणांची बुधवारी काेविड चाचणी करण्यात आली. शासनाने दिशानिर्देशित केलेल्या नियमांचे प्रत्येकाने पालन करावे, असे आवाहन ठाणेदार हरिश्चंद्र गावडे यांनी यावेळी केले. विनाकारण घराबाहेर फिरणाऱ्यांवर कारवाई केली जात असून, ही माेहीम अशीच सुरू राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
विनामास्क व नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जात आहे. यात आतापर्यंत ग्रामपंचायतीने २६ हजार ७५० रुपयांचा दंड वसूल केला आहे. विनाकारण घराबाहेर फिरू नका, शासनाच्या नियमांचे पालन करा, दिलेल्या वेळेतच आपली दुकाने सुरू ठेवा, घरी राहा-सुरक्षित राहा असे आवाहन करण्यात आले हाेते. परंतु याकडे नागरिक दुर्लक्ष करीत असल्याचे पाहता, ठाणेदार हरिश्चंद्र गावडे यांनी आराेग्य कर्मचाऱ्यांच्या मदतीने विनाकारण फिरणाऱ्यांची काेविड चाचणी करीत कारवाईला सुरुवात केली. साेबतच नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली गेली.
यावेळी ठाणेदार हरिश्चंद्र गावडे, पाेलीस कर्मचारी कुणाल आरगुडे, चेतन राठोड, राजेश कोल्हे, कांडलकर, आरोग्य सेवक लीलाधर पारीसे, कुशल मातकर व होमगार्ड जवान उपस्थित हाेते.