नागपुरात ‘टॉपवर्थ’वर धडकली सीबीआय; ६३.१० कोटींचा बँक घोटाळा; छत्तीसगडमध्येही छापे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 1, 2021 10:48 PM2021-11-01T22:48:04+5:302021-11-01T22:48:45+5:30

Nagpur News अधिकारी आणि दलालांशी संगनमत करून बँकेला तब्बल ६३.१० कोटींचा गंडा घालणाऱ्या टॉपवर्थ स्टील प्रा.लि.च्या स्थानिक कार्यालयात सोमवारी सीबीआयचे पथक धडकले.

CBI hits 'Topworth' in Nagpur; 63.10 crore bank scam; Impressions are gained in a fluid, global, diffused way | नागपुरात ‘टॉपवर्थ’वर धडकली सीबीआय; ६३.१० कोटींचा बँक घोटाळा; छत्तीसगडमध्येही छापे

नागपुरात ‘टॉपवर्थ’वर धडकली सीबीआय; ६३.१० कोटींचा बँक घोटाळा; छत्तीसगडमध्येही छापे

Next
ठळक मुद्देप्रदीर्घ चाैकशी, कागदपत्रे जप्त

नागपूर : अधिकारी आणि दलालांशी संगनमत करून बँकेला तब्बल ६३.१० कोटींचा गंडा घालणाऱ्या टॉपवर्थ स्टील प्रा.लि.च्या स्थानिक कार्यालयात सोमवारी सीबीआयचे पथक धडकले. सदर भागातील श्रीराम टॉवरमध्ये असलेल्या कंपनीच्या कार्यालयात सीबीआयने तब्बल सात ते आठ तास झाडाझडती घेतली. नागपूरसोबतच मुंबई आणि छत्तीसगडमध्येही सीबीआयने आज एकाचवेळी छापेमारी केली.

सूत्रांच्या माहितीनुसार, २०१४ ते २०१६ या कालावधीत मे. टॉपवर्थ स्टील्स ॲन्ड पॉवर प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या संचालकांनी बँकेच्या अधिकाऱ्यांशी संगनमत करून

एकूण ६३.१० कोटींनी फसवणूक केल्याचे उघडकीस आले आहे. लोढा बंधूंनी आयडीबीआय बँकांच्या कन्सोर्टियमअंतर्गत घेतलेल्या विविध पत सुविधांमध्ये फसवणूक केली. यात लेटर ऑफ क्रेडिट, ट्रेड क्रेडिट बँक गॅरंटी, बँक गॅरंटी आदी बनावट दस्तावेज बनविले. त्याच्या आधारावर कर्ज उचलून बुडविले. हा गैरप्रकार उघड झाल्यानंतर सीबीआयने

गुन्हा दाखल केला. यानंतरच्या कारवाईचा भाग म्हणून कंपनी आणि आरोपींशी संबंधित कार्यालये, सदनिकांची झाडाझडती घेण्यासाठी सीबीआयने सोमवारी एकाच वेळी नागपूर, मुंबई तसेच छत्तीसगडसह नऊ ठिकाणी छापे घातले. येथील सदर परिसरात असलेल्या श्रीराम टॉवरमध्ये कंपनीच्या कार्यालयात सीबीआयच्या पथकाने तब्बल सात ते आठ तास झाडाझडती घेतली. तेथून कागदपत्रे जप्त करण्यात आली. यासंबंधाने अधिकृत माहिती सीबीआयकडून उपलब्ध होऊ शकली नाही.

-------

Web Title: CBI hits 'Topworth' in Nagpur; 63.10 crore bank scam; Impressions are gained in a fluid, global, diffused way

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.