अनिल देशमुख यांच्या नागपूर निवासस्थानी सीबीआयची छापेमारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2021 11:01 AM2021-10-11T11:01:17+5:302021-10-11T11:45:54+5:30

मनी लाँड्रिंग प्रकरणी राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्या निवासस्थानी आज सीबीआयचे(CBI) छापे टाकण्यात आले असून देशमुख यांचा मुलगा आणि सुनेला अटक होण्याची शक्यता आहे. (anil deshmukh case)  

CBI raids Anil Deshmukh's Nagpur residence | अनिल देशमुख यांच्या नागपूर निवासस्थानी सीबीआयची छापेमारी

अनिल देशमुख यांच्या नागपूर निवासस्थानी सीबीआयची छापेमारी

Next
ठळक मुद्देमुलगा सलील देशमुख आणि सुन रिद्धी देशमुख यांचा अटक वॉरंट

नागपूर : मनी लाँड्रिंग (money laundering) प्रकरणी राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्या निवासस्थानी आज सीबीआयने(CBI) छापेमारी केली. सीबीआयचे ७ अधिकारी देशमुखांच्या घरी पोहचले असून देशमुख यांचा मुलगा आणि सुनेला अटक होण्याची शक्यता आहे. (anil deshmukh money laundering case)

अनिल देशमुख यांच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढच होताना दिसत आहे. नुकतेच काही दिवासांआधी देशमुखांच्या नागपूर निवासस्थानी आयकर विभागाने छापा टाकला होता. तर, आज सकाळी ८ वाजता सीबीआयचे ७ अधिकारी देशमुख यांचे पोहचले. त्यांच्याकडे देशमुख यांचे सुपुत्र सलील देशमुख आणि सून रिद्धी देशमुख यांच्या अटकेचा वॉरन्ट असून त्यांना अटक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

दरम्यान, अँटिलिया स्फोटकं प्रकरणानंतर राज्यातील पोलीस अधिकाऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात बदल्या झाल्या होत्या. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केलेल्या १०० कोटी रुपयांच्या वसुलीच्या आरोपानंतर देशमुख यांना गृहमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. तेव्हापासूनच केंद्रीय तपास यंत्रणेचा सपाटा त्यांच्या मागे लागला. यापूर्वी ईडीने ६ वेळा, सीबीआयने ३ वेळा तसेच आयकरनेही एकदा देशमुख यांच्या घरी छापेमारी केली आहे.

Web Title: CBI raids Anil Deshmukh's Nagpur residence

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.